सिक्युरिटी कव्हर मोडत चाहता घुसला मैदानात, सुरक्षेचे तीनतेरा
गुजरातमधील अहमदाबाद शहरात बुधवारी जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानाचं उद्घाटन झालं. या मैदानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं. नवीन वर्षातला टीम इंडियाचा हा पहिलाच डे-नाईट टेस्ट सामना आहे. सध्या जगभरात कोरोनाचं वातावरण लक्षात घेता दोन्ही संघांसाठी Bio Secure Bubble तयार करण्यात आलंय. स्टेडीयमवरही ठराविक संख्येत फॅन्सना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतू […]
ADVERTISEMENT
गुजरातमधील अहमदाबाद शहरात बुधवारी जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानाचं उद्घाटन झालं. या मैदानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं. नवीन वर्षातला टीम इंडियाचा हा पहिलाच डे-नाईट टेस्ट सामना आहे. सध्या जगभरात कोरोनाचं वातावरण लक्षात घेता दोन्ही संघांसाठी Bio Secure Bubble तयार करण्यात आलंय. स्टेडीयमवरही ठराविक संख्येत फॅन्सना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
परंतू पहिल्या दिवसाच्या खेळादरम्यान विराट कोहली आणि रोहित शर्मा बॅटींग करत असताना स्टेडीयमवर मॅच पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या एका चाहत्याने सिक्युरीटी कव्हर मोडून थेट मैदानावर विराटच्या दिशेने धाव घेतली. बॅटींग करत असताना एक फॅन आपल्या दिशेने धावत येतोय हे पाहून विराटही पहिल्यांदा थोडासा थबकलाच आणि त्याने या फॅनला पाठीमागे जायला सांगितलं.
Fan breaches security to meet Virat Kohli#INDvsENG pic.twitter.com/qCF7QQn2hj
— Trollmama_ (@Trollmama3) February 24, 2021
महत्वाची गोष्ट म्हणजे एवढा सगळा प्रकार घडत असताना मैदानातील सुरक्षा कर्मचारी किंवा पोलीस कर्मचारी तिकडे उपस्थित नव्हते. ज्यावेळी हा फॅन परत आपल्या जागेच्या दिशेने यायला लागला त्यावेळी एका सुरक्षा कर्मचाऱ्याने त्याला पकडून बाहेर नेलं. अवघ्या काही मिनीटांत हा प्रकार घडल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
हे वाचलं का?
Ye raha fan pic.twitter.com/VFdWCA98y9
— Rahul (@rahulsbk13) February 24, 2021
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा खेळाडूंना त्रास होऊ नये यासाठी Bio Secure Bubble तयार करण्यात आलेलं आहे. बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात कोणताही खेळाडू येणार नाही याची विशेष काळजी घेणं आयोजकांना बंधनकारक आहे. याचसोबत मैदानात उपस्थित असलेल्या फॅन्सचीही विशेष तपासणी करुन त्यांना मैदानावर सोडलं जातंय. याआधी चेन्नईतही एका फॅनने अशाच पद्धतीने सिक्युरीटी कव्हर मोडत मैदानावर प्रवेश केला होता. यानंतर अहमदाबादमध्येही असाच प्रसंग घडल्यामुळे आयोजन आणि Bio Secure Bubble बद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT