Vijay Hajare Trophy : मुंबईचा सलग पाचवा विजय, हिमाचलचा धुव्वा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई संघाने विजय हजारे ट्रॉफीत आपली धडाकेबाज कामगिरी सुरुच ठेवली आहे. जयपूरमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात मुंबईने हिमाचल प्रदेशचा २०० रन्सनी धुव्वा उडवला. सूर्यकुमार यादव, आदित्य तरे, शार्दुल ठाकूर यांच्या धडाकेबाज हाफ सेंच्युरीच्या जोरावर मुंबईने ३२१ रन्सचा टप्पा गाठला.

टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतलेल्या मुंबईची खराब सुरुवात झाली. यशस्वी जैस्वाल, पृथ्वी शॉ आणि कॅप्टन श्रेयस अय्यर स्वस्तात माघारी परतले. यानंतर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात सर्फराज खानही आऊट झाला. ४ बाद ४९ अशा खडतर परिस्थितीत अडकलेल्या मुंबईला सूर्यकुमार यादव आणि आदित्य तरे यांनी सावरलं. दोघांनीही पाचव्या विकेटसाठी ९९ रन्सची पार्टनरशीप केली. ९१ रन्सवर सूर्यकुमार यादवला आऊट करत हिमाचलच्या डागरने मुंबईला धक्का दिला.

यानंतर मैदानावर आलेल्या शार्दुल ठाकूरने हिमाचलच्या अडचणींमध्ये आणखी भर टाकली. आदित्य तरेच्या साथीने पुन्हा फटकेबाजी सुरुवात करत शार्दुलने हिमाचलच्या बॉलर्सना सळो की पळो करुन सोडलं. आदित्य तरे ८३ रन्स काढून आऊट झाल्यानंतरही शार्दुलने फटकेबाजी सुरु ठेवली. ५७ बॉलमध्ये ६ फोर आणि सिक्स लगावत शार्दुलने ९२ रन्स केल्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्रत्युत्तरादाखल हिमाचल प्रदेशच्या संघाची सुरुवातच चांगली झाली नाही. प्रशांत सोळंकी, धवल कुलकर्णी, शम्स मुलानी यांच्या माऱ्यासमोर हिमाचलचा संघ गडगडला. एकामागोमाग एक बॅट्सन आऊट होत गेल्याने मुंबईचा विजय सोपा होऊन गेला. हिमाचल प्रदेशकडून एकांत सेन, प्रवीण ठाकूर, कॅप्टन रिशी धवन आणि मयांक डागर यांनी झुंज दिली पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT