पृथ्वी शॉची डबल सेंच्युरी…मैदानात सिक्स-फोरचा पाऊस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आपल्या खराब कामगिरीमुळे चर्चेत आलेल्या मुंबईकर पृथ्वी शॉने अखेरीस आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला आहे. विजय हजारे ट्रॉफीत मुंबईचं प्रतिनिधीत्व करताना पुदुच्चेरीविरुद्ध मॅचमध्ये पृथ्वी शॉने नॉटआऊट डबल सेंच्युरी झळकावत आपण फॉर्मात असल्याचं सिद्ध केलंय. जयपूरच्या ग्राऊंडवर सुरु असलेल्या या सामन्यात पृथ्वी शॉने बॉलर्सवर चौफेर हल्लाबोल करत १५२ बॉल्समध्ये २२७ रन्स केल्या. या इनिंगमध्ये पृथ्वीने ३१ फोर आणि ५ सिक्स लगावल्या.

इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळालेल्या सूर्यकुमार यादवनेही सेंच्युरी झळकावत आपली निवड सार्थ ठरवली. सूर्यकुमार यादव ५८ बॉलमध्ये १३३ रन्स करुन आऊट झाला. दरम्यान पृथ्वी शॉने नाबाद २२७ रन्सची इनिंग खेळत संजू सॅमसनचा नाबाद २१२ रन्सचा विक्रम मोडला आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेल्या खराब कामगिरीनंतर पृथ्वी शॉची इंग्लंडविरुद्ध टेस्ट सिरीजसाठी भारतीय संघात निवड झालेली नव्हती. यानंतर टी-२० सिरीजसाठीही पृथ्वीचा विचार झाला नाही. परंतू पृथ्वीने विजय हजारे ट्रॉफीत आतापर्यंत दिल्लीविरुद्ध नॉटआऊट १०५, महाराष्ट्राविरुद्ध ३४ आणि पुदुच्चेरीविरुद्ध २२७ रन्सची इनिंग खेळत आपल्या टीकाकारांना उत्तर दिलंय.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT