विराट कोहलीच्या राजीनामा पत्रात फक्त दोन नावांचा उल्लेख, पद सोडताना नेमकं काय म्हणाला कोहली?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

T20 आणि एकदिवसीय कर्णधार पदानंतर आता विराट कोहलीने भारतीय कसोटी संघाचं कर्णधारपदही सोडलं आहे. दक्षिण अफ्रिकेविरोधातली कसोटी गमावल्यानंतर विराट कोहलीने निर्णय जाहीर केला. सोशल मीडियावर पोस्ट लिहून विराट कोहलीने त्यांना निर्णय जाहीर केला. विराट कोहलीने त्याच्या राजीनामा पत्रात दोन नावांचा उल्लेख केला आहे.

ADVERTISEMENT

जाणून घ्या नेमकं काय म्हटलं आहे विराट कोहलीने?

हे वाचलं का?

‘सात वर्षांची मेहनत आणि संघर्ष करून संघाला योग्य दिशेने घेऊन जाण्याचा मी प्रयत्न केला. मी माझे काम प्रामाणिकपणे केले असून कोणतीही कसर सोडलेली नाही. कधीतरी थांबले पाहिजे आणि भारताच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्याची हीच योग्य वेळ आहे. या प्रवासात माझ्यासाठी अनेक चढ-उतार आले आणि माझ्या वैयक्तिक कारकिर्दीतही चढ-उतार आले, पण या काळात माझ्याकडून कधीही प्रयत्नांची कमतरता आली नाही, किंवा माझ्यात आत्मविश्वासाची कमतरता आली नाही. माझा 12- टक्के देण्यावर नेहमीच विश्वास होता.

मला इतक्या मोठ्या कालावधीपर्यंत देशाचं नेतृत्व करण्याची संधी दिली, त्याबद्दल बीसीसीआयचे आभार व्यक्त करतो. तसेच पहिल्या दिवसापासून मला साथ देणाऱ्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. तुमच्यामुळे माझं करियर संस्मरणीय आणि सुंदर झाल. रवी भाई (रवी शास्त्री) आणि सपोर्ट स्टाफ यांचेही आभार, यांच्यामुळे भारतीय संघाची कामगिरी उंचावली. भारतीय संघाच्या यशात यांचाही मोलाचा वाटा आहे. सर्वात अखेरीस एम.एस. धोनीचेही आभार.. त्याने कर्णधार म्हणून माझ्यावर विश्वास दाखवला अन् त्याला माझ्यात भारतीय क्रिकेटला पुढे घेऊन जाणारा खेळाडू दिसला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

दक्षिण अफ्रिकेतील मालिका पराभवानंतर विराट कोहलीने मोठा निर्णय घेतला आहे. शनिवारी संध्याकाळी विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडलं असल्याची घोषणा केली आहे. विराट कोहलीने ट्विटरवर एक मेसेज शेअर करून याची घोषणा केली आहे.

BCCIने विराट कोहलीला दिल्या शुभेच्छा

बीसीसीआयने विराट कोहलीच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. विराटच्या ट्विटनंतर काही वेळातच बीसीसीआयचे ट्विट समोर आलं आहे. ज्यामध्ये बोर्डाने विराटला त्याच्या कसोटी कर्णधारपदाच्या आजवरच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. भारतीय कसोटी कर्णधार म्हणून 40 सामने जिंकण्याच्या विक्रमाबद्दल बीसीसीआयने विराट कोहलीचे अभिनंदनही केले आहे.

विराट कोहलीने आधीच टी-20, वनडेचे कर्णधारपद सोडले आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी विराट कोहलीने टी-20 फॉरमॅटचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती, भारताच्या पराभवानंतर बीसीसीआयने त्याला वनडेच्या कर्णधारपदावरूनही दूर सारलं होतं. ज्यामुळे विराट नाराज झाला होता. आता द. अफ्रिकेवर विराट कसोटी संघाचा कर्णधारही नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT