VIVO पुन्हा IPL साठी स्पॉन्सर, काँग्रेसचा भाजपला चिमटा
आयपीएल २०२१ साठी VIVO ही चिनी मोबाईल कंपनीने पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे. २०२० मध्ये भारत आणि चीन यांच्यातील सैन्यांमध्ये सीमेवर झालेल्या संघर्षानंतर देशात चीनविरोधी वातावरण निर्माण झालं होतं. चिनी वस्तूंना भारतात थारा द्यायचा नाही अशी भावना भारतीय लोकांमध्ये होती. जनमानसात चिनी कंपन्यांना होणारा विरोध पाहता बीसीसीआयने VIVO सोबत असलेला करार एका वर्षासाठी स्थगित केला […]
ADVERTISEMENT
आयपीएल २०२१ साठी VIVO ही चिनी मोबाईल कंपनीने पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे. २०२० मध्ये भारत आणि चीन यांच्यातील सैन्यांमध्ये सीमेवर झालेल्या संघर्षानंतर देशात चीनविरोधी वातावरण निर्माण झालं होतं. चिनी वस्तूंना भारतात थारा द्यायचा नाही अशी भावना भारतीय लोकांमध्ये होती. जनमानसात चिनी कंपन्यांना होणारा विरोध पाहता बीसीसीआयने VIVO सोबत असलेला करार एका वर्षासाठी स्थगित केला होता. Dream 11 ने २२२ कोटी रुपये मोजत आयपीएलला स्पॉन्सरशीप दिली होती. यानंतर नवीन सिझनच्या ऑक्शनदरम्यान आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी VIVO is Back with us असं म्हणत यंदाच्या सिझनमध्ये VIVO आयपीएलचं स्पॉन्सर असल्याचं जाहीर केलं.
ADVERTISEMENT
काँग्रेसने यावरुन भाजपला टोला लगावला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी, ना कोई घुसा है, ना किसी को घुसने देंगे?? असं ट्विट करत केंद्र सरकारच्या चीनविरोधी धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सध्या माजी कर्णधार सौरव गांगुली असून सचिव पदाचा कारभार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा सांभाळत आहे. यावरुनच आयपीएलमध्ये VIVO कंपनीच्या स्पॉन्सरशीपवरुन काँग्रेसने भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय.
ना कोई घुसा है, ना किसी को घुसने देंगे ? pic.twitter.com/LVleAQ4SHz
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) February 18, 2021
VIVO आणि BCCI मध्ये २०१७ ते २०२२ या कालावधीसाठी आयपीएल स्पॉन्सरशीपसाठी करार झाला होता. ज्यासाठी VIVO कंपनी बीसीसीआयला प्रत्येक सिझनसाठी ४४० कोटी रुपये देत होती. परंतू २०२० मध्ये भारत-चीन संघर्षानंतर बीसीसीआयला VIVO सोबतचा करार स्थगित करावा लागला. नवीन हंगामाच्या आयोजनावेळी स्पॉन्सरशीपचे हक्क दुसऱ्या कंपनीकडे ट्रान्सफर करता येतील का यासाठी VIVO आणि BCCI यांच्यात चर्चा सुरु होती. परंतू अखेरीस VIVO कंपनीलाच IPL ची स्पॉन्सरशीप देण्याचा निर्णय BCCI ने घेतला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT