Rishabh Pant health News : पंतची प्लास्टिक सर्जरी, MRI रिपोर्टमध्ये काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Rishabh Pant health latest news : भारतीय क्रिकेट संघातील यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) शुक्रवारी (30 डिसेंबर 2022) झालेल्या कार अपघातात (car accident) थोडक्यात बचावला. रुडकीजवळ झालेल्या भयंकर कार अपघातात (Rishabh Pant car accident) ऋषभ पंत गंभीर जखमी झाला. सध्या त्याच्यावर देहरादून येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. (how is rishabh pant health condition)

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार कार अपघातात ऋषभ पंतला सगळ्यात जास्त जखमा डोक्याला आणि पायाला झाल्या आहेत. त्यामुळे ऋषभ पंतच्या मेंदूचा आणि मणक्याचा एमआरआय स्कॅन करण्यात आला. एमआरआय रिपोर्ट समोर आला असून, सर्व काही नॉर्मल आहे. त्यामुळे ऋषभ पंतसह त्याच्या चाहत्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

ऋषभ पंत हेल्थ अपडेट : डॉक्टरांनी काय सांगितलं?

ऋषभ पंतच्या तब्येतीबद्दल डॉक्टरांनी माहिती दिलीये. ऋषभ पंतच्या अजून चाचण्या व्हायच्या आहेत. त्यांच्या गुडघ्याचाही एमआरआय करायचा होता, मात्र तो टाळला गेला आहे. कारण ऋषभ पंतला खूप त्रास होत होता आणि सूजही आलेली होती. आज (31 डिसेंबर 2022) एमआरआय केला जाऊ शकतो, असं डॉक्टर म्हणाले.

हे वाचलं का?

Rishabh Pant Accident: डोकं, गुडघ्याला दुखापत.. पंतचं करिअर धोक्यात?

कार अपघातात ऋषभ पंतच्या चेहऱ्यावरही जखमा झालेल्या आहेत. अनेक ठिकाणी त्वचा फाटली आहे, तर खरचटलेलंही आहे. या जखमा बऱ्या करण्यासाठी प्लास्टिक सर्जरीही करण्यात आली आहे. ऋषभ पंतच्या डाव्या गुडघ्यावर लिकमेंटची समस्या होऊ शकते. त्यामुळेच गुडघ्यावर पट्टी बांधण्यात आली आहे. ऋषभ पंतची प्रकृती आता चांगली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

Rishabh Pant : ऋषभ पंतच्या कार अपघाताची थरकाप उडवणारी दृश्ये

ADVERTISEMENT

बस ड्रायव्हरने केली ऋषभ पंतला मदत

कार अपघातानंतर ऋषभ पंत काच फोडून बाहेर आला. त्यानंतर तो एका बस ड्रायव्हरजवळ केला. बस चालकाने ऋषभ पंतला सांभाळलं आणि रुग्णवाहिका बोलावली. त्यानंतर ऋषभ पंतला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. बस चालक सुशीलने सांगितलं की, अपघातानंतर ऋषभ पंत रक्ताने लथपथ झालेला होता आणि त्याने स्वतःचं ऋषभ पंत असल्याचं सांगितलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT