पंतला सुट्टी, राहुलचं उपकर्णधार पद काढून निवड समितीने काय दिला मेसेज?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

श्रीलंकेविरुद्ध 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री उशिरा बीसीसीआयने टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा केली. टी-20 मालिकेतून सिनिअर खेळाडू. विश्रांती मिळाली आहे, मात्र सर्व खेळाडू एकदिवसीय मालिकेत परततील. टीम इंडियाची घोषणा झाली तेव्हा अनेक धक्कादायक निर्णयही पाहायला मिळाले. केएल राहुलचे वनडे संघातील उपकर्णधारपद काढून घेण्यात आले आहे, तर ऋषभ पंतला पुन्हा संधी मिळालेली नाही. दुसरीकडे, सूर्यकुमार यादवला टी-20 संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

1. केएल राहुलचे डिमोशन:

केएल राहुलला टी-20 मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे, परंतु तो एकदिवसीय मालिकेत आहे. आता हार्दिक पांड्याला उपकर्णधार बनवण्यात आल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. केएल राहुल सतत खराब फॉर्मशी झुंजत आहे आणि तो नेतृत्वाची भूमिका पार पाडू शकला नाही, अशा परिस्थितीत निवडकर्त्यांनी कठोर निर्णय घेतला आहे.

2. शिखर धवनची कारकीर्द संपली का?

अनेक प्रसंगी टीम इंडियाचे वनडे संघात कर्णधारपद भूषवणाऱ्या शिखर धवनबाबत आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बांगलादेश मालिकेत तो अपयशी ठरला आणि त्याचे वयही वाढत आहे, अशा स्थितीत निवड समितीने शिखर धवनला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आता तो एकदिवसीय विश्वचषकाच्या टीममध्येराहणार की नाही याबाबत शंका आहे.

हे वाचलं का?

3. ऋषभ पंतवरही अॅक्शन

पांढऱ्या चेंडूच्या फॉर्मेटमध्ये खराब फॉर्ममुळे झगडणाऱ्या ऋषभ पंतची वनडे संघात पुन्हा निवड झालेली नाही. त्याच्या गुडघ्यात काही समस्या असल्याची माहिती समोर येत आहे, अशा परिस्थितीत टी-20 मालिकेने दिलासा दिला आहे. पण वनडे संघात निवड न झाल्याने शंका निर्माण होत आहे.

4. सूर्यकुमार यादवचे प्रमोशन:

सन 2022 मध्ये टी-20 फॉरमॅटमध्ये आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकणाऱ्या सूर्यकुमार यादवला बक्षीस मिळाले आहे. निवडकर्त्यांनी त्याची टी-२० फॉरमॅटमध्ये उपकर्णधारपदी नियुक्ती केली आहे. वरिष्ठांच्या अनुपस्थितीत हार्दिक कर्णधारपद सांभाळेल तर सूर्या उपकर्णधार असेल.

ADVERTISEMENT

5. इशान किशनवर दाखवला विश्वास:

ऋषभ पंतला पांढऱ्या चेंडूच्या फॉरमॅटमध्ये खराब कामगिरी केल्याबद्दल फटका बसला आहे, तर इशान किशनला बक्षीस मिळाले आहे. त्याने बांगलादेश दौऱ्यावर एकदिवसीय संघात द्विशतक झळकावले होते, त्यामुळे त्याची टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी निवड झाली आहे. टी-20 मध्ये तो यष्टिरक्षण करु शकतो.

ADVERTISEMENT

टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया:

हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार

वनडे मालिकेसाठी टीम इंडिया:

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT