IPL Auction 2023 नंतर कोणता संघ मजबूत?; पाहा सर्व 10 संघांचे स्कॉड
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 सीझनचा लिलाव शुक्रवारी (23 डिसेंबर) कोची येथे झाला. यावेळी लिलावात 405 खेळाडू निवडण्यात आले. सर्व 10 संघांकडे खेळाडू खरेदी करण्यासाठी 87 स्लॉट होते. मात्र लिलावात केवळ 80 खेळाडूंचीच विक्री झाली आहे. यामध्ये 29 खेळाडू परदेशी ठरले आहेत. या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी सर्व संघांनी एकूण 167 कोटी रुपये खर्च केले. आयपीएलचे […]
ADVERTISEMENT

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 सीझनचा लिलाव शुक्रवारी (23 डिसेंबर) कोची येथे झाला. यावेळी लिलावात 405 खेळाडू निवडण्यात आले. सर्व 10 संघांकडे खेळाडू खरेदी करण्यासाठी 87 स्लॉट होते. मात्र लिलावात केवळ 80 खेळाडूंचीच विक्री झाली आहे. यामध्ये 29 खेळाडू परदेशी ठरले आहेत. या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी सर्व संघांनी एकूण 167 कोटी रुपये खर्च केले. आयपीएलचे 7 संघ भरले आहेत. त्यांच्या संघात 25-25 खेळाडू पूर्ण झाले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) च्या संघात 22 खेळाडू आहेत, तर मुंबई इंडियन्सचे 24 आणि पंजाब किंग्सचे 22 खेळाडू आहेत. अशा स्थितीत या तिन्ही संघांमध्ये अजूनही 7 जागा शिल्लक आहेत.
चेन्नई सुपर किंग्ज (CSK)
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, सुभ्रांशु सेनापती, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, के भगत वर्मा, मोईन अली, राजवर्धन, शिवम दुबे, दीपक चहर, महिश तेक्षाना, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सिमरजित सिंग, अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे, बेन स्टोक्स, मथिशा पाथीराना, शेख रशीद, निशांत सिंधू, काइल जेम्सन आणि अजय मंडल.
दिल्ली कॅपिटल्स (DC)
ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोमेन पॉवेल, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, ललित यादव, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सरफराज खान, विकी ओस्तवाल, यश धुल, अमन खान, एनरिक नोर्किया, चेतन साकारिया, कुलदीप यादव, लुंगी एनगिडी, मुस्तफिझूर रहमान, खलील अहमद, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनीष पांडे आणि रिले रोसो.
गुजराज टायटन्स (GT)
हार्दिक पंड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, शुबमन गिल, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, बी साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, जयंत यादव, प्रदीप सांगवान, राहुल तेवतिया, शिवम मावी, विजय शंकर, अल्जापूर , मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, यश दयाल, केन विल्यमसन, जोशुआ लिटल, ओडिन स्मिथ, उर्विल पटेल, केएस भरत आणि मोहित शर्मा.