Brij Bhushan Singh यांच्याविरोधात सुरु असलेलं अंदोलन का मागे घेण्यात आलं?
कुस्तीच्या आखाड्यात हात आजमावलेल्या पैलवानांनी तीन दिवस जंतरमंतरवर उतरून आपल्याच महासंघाच्या अध्यक्षांवर आरोपांचा वर्षाव केला. भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार, मानसिक छळ केल्याचा आरोप करत जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी बोलून ते मागे घेतल्याची घोषणा केली आहे. बजरंग पुनियासह, महिला कुस्तीपटू विनेश फोगट, […]
ADVERTISEMENT
कुस्तीच्या आखाड्यात हात आजमावलेल्या पैलवानांनी तीन दिवस जंतरमंतरवर उतरून आपल्याच महासंघाच्या अध्यक्षांवर आरोपांचा वर्षाव केला. भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार, मानसिक छळ केल्याचा आरोप करत जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी बोलून ते मागे घेतल्याची घोषणा केली आहे.
बजरंग पुनियासह, महिला कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक यांच्यासह 30 कुस्तीपटूंनी डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात निदर्शने सुरू केली. कुस्तीपटू ब्रिज भूषण शरण सिंग यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपाची निष्पक्ष चौकशी आणि WFI तत्काळ विसर्जित करण्याची मागणी करत होते.
आंदोलक कुस्तीपटूंनी याबाबत भारतीय ऑलिम्पिक संघटनेला पत्रही लिहिले होते. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आंदोलक कुस्तीपटूंशी दोन दिवस चर्चा केली. क्रीडामंत्री आणि आंदोलक कुस्तीपटू यांच्यात दुसऱ्या दिवसाच्या चर्चेत अनेक मुद्यांवर समझोता झाला, त्यानंतर कुस्तीपटूंनी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि विरोधाचे नेतृत्व करणारे कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
क्रीडा मंत्री आणि कुस्तीपटूंमध्ये 7 तास चर्चा
क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि कुस्तीपटूंमध्ये सुमारे सात तास चर्चा झाली. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, कुस्तीपटूंचे म्हणणे ऐकून घेतले, त्यांचे आरोप आणि मागण्याही ऐकून घेतल्या. ते म्हणाले की, कुस्तीपटूंनी आरोप केल्यानंतरच आम्ही डब्ल्यूएफआयला नोटीस पाठवून 72 तासांत उत्तर देण्यास सांगितले होते.
तपास होईपर्यंत ब्रिजभूषण कुस्ती संघटनेच्या कामापासून दूर राहणार
क्रीडामंत्र्यांनी सांगितले की, एक संनियंत्रण समिती स्थापन करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असून, त्यात लोकांचा समावेश केला जाईल. त्याचीही घोषणा केली जाईल. ते म्हणाले की ही समिती डब्ल्यूएफआय अध्यक्षांवरील आरोपांची चार आठवड्यात तपासणी करून आपला अहवाल सादर करेल. डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष (बृजभूषण शरण सिंग) चौकशी पूर्ण होईपर्यंत असोसिएशनच्या दैनंदिन कामकाजापासून दूर राहतील, असेही क्रीडामंत्र्यांनी सांगितले. ते तपासात सहकार्य करतील.
ADVERTISEMENT
कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतले
क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी चौकशीसाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर, कुस्तीपटूंनी गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन मागे घेतले आहे. कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी निष्पक्ष चौकशीची अपेक्षा व्यक्त केली आणि डब्ल्यूएफआयच्या अध्यक्षांनी खेळाडूंना धमकावले असल्याचे सांगितले. क्रीडामंत्र्यांनीही याबाबत आम्हाला आश्वासन दिले आहे, असं तो म्हणाला.
ADVERTISEMENT
कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरणवर केले हे आरोप
जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर अनेक आरोप केले. महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण होत असून त्यांचा मानसिक छळ होत असल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला आहे. कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरही कुस्तीगीर, शिवीगाळ आणि त्रास दिल्याचा आरोप केला आहे.
ADVERTISEMENT