वाह! 'लेडी बुमराह'नं नादच केला, गोलंदाजी पाहून सर्वांच्याच उंचावल्या भुवया, पाहा VIDEO

मुंबई तक

ADVERTISEMENT

Jusprit Bumrah Style Viral Video
Jusprit Bumrah Style Viral Video
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बुमराहसारखी गोलंदाजी करणाऱ्या तरुणीवर कौतुकाचा वर्षाव

point

लेडी बुमराहचा व्हिडीओ होतोय व्हायरल

point

भेदक गोलंदाजीचा व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Jasprit Bumrah's Bowling Action Emulates By Young Girl : भारतीय क्रिकेट संघाचा हुकमी एक्का म्हणून ठसा उमटवलेल्या जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीनं भल्या भल्या फलंदाजांना घाम फोडलाय. भेदक गोलंदाजी ही बुमराहची खासीयत आहे. बुमराहच्या गोलंदाजीचा सामना करणं कोणत्याही फलंदाजासाठी मोठं आव्हान असतं. यामुळेच बुमराहची गोलंदाजी अनेक युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. क्रिकेटचा वेड असलेल्या महिला खेळाडूही बुमराहच्या चाहत्या आहेत. म्हणून युवा खेळाडूंना बुमराहसारखी गोलंदाजी करायची आहे. कारण बुमराह क्रीडाविश्वात किती लोकप्रीय आहे, याचं एक उत्तम उदाहरण लेडी बुमराहच्या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. 

ADVERTISEMENT

बुमराहसारखी गोलंदाजी करणाऱ्या मुलीचा व्हिडीओ पाहिलात का:?

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, यामध्ये एक तरुणी बुमराहसारखी गोलंदाजी करताना दिसत आहे. बुमराहच्या गोलंदाजीची हुबेहुब अॅक्शन करुन या शाळकरी मुलीनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लेडी बुमराह अशं टॅग दिलं आहे. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.  बुमराहसारखी जबरदस्त गोलंदाजी करणाऱ्या तरुणीवर नेटकऱ्यांनी स्तुतीसुमने उधळली आहेत. 

हे ही वाचा >> Gold Price Today: अगं बाई, काय हे... केवढं महाग ते 'सोनं'! आजचा भाव बघितला का?

हे वाचलं का?

बुमराहने वर्ल्डकपमध्ये केली चमकदार कामगिरी

टी-२० वर्ल्डकप संपल्यानंतर बुमराहने विश्रांती घेतली आहे. बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत बुमराह पुनरागमन करण्याची शक्यता आहे. तो झिम्बाब्वे मालिकेत खेळला नव्हता. त्यानंतर श्रीलंके विरोधात खेळलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० आणि वनडे मालिकेलाही बुमराह मुकला होता. टी-२० वर्ल्डकपमध्ये बुमराहने भेदक गोलंदाजी करून चमकदार कामगिरी केली होती. बुमराहने टी-२० वर्ल्डकपमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत १५ विकेट्स घेतल्या होत्या. बुमराहला प्लेयर ऑफ द टूर्नामेंटच्या किताबाने सन्मानित करण्यात आलं. बुमराहने ८ सामन्यांमध्ये ८.२७ च्या सरासरीनं आणि ४.१७ च्या इकोनॉमीनं १५ विकेट्स घेतल्या होत्या. 

हे ही वाचा >> Supriya Sule : "राज्यात पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला, तर..."; सुप्रिया सुळेंनी महायुती सरकारला दिला इशारा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT