Virat kohli आणि Rohit Sharma ला T20 संघात का स्थान नाही?; द्रविड म्हणाला…
वनडे मालिका संपल्यानंतर टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-20 सामनेही खेळायचे आहेत. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या खेळाडूंना टी-20 मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलेले नाही आणि हार्दिक पांड्याकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. गेल्या वर्षी T20 विश्वचषकातून भारत उपांत्य फेरीतून बाहेर पडल्यापासून विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या T20 कारकिर्दीबाबत प्रश्न उपस्थित केले […]
ADVERTISEMENT

वनडे मालिका संपल्यानंतर टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-20 सामनेही खेळायचे आहेत. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या खेळाडूंना टी-20 मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलेले नाही आणि हार्दिक पांड्याकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. गेल्या वर्षी T20 विश्वचषकातून भारत उपांत्य फेरीतून बाहेर पडल्यापासून विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या T20 कारकिर्दीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर पाहिलं तर, T20 विश्वचषकानंतर तिघांनीही क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये एकही सामना खेळलेला नाही.
आता टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने विराट कोहली आणि रोहित शर्मा टी-20 संघात नसल्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. कोहली आणि रोहित शर्मा यांना वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत ब्रेक देण्यात आल्याचे द्रविडने सांगितले. या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका आणि एकदिवसीय विश्वचषक यांसारख्या मोठ्या स्पर्धा आहेत, अशा परिस्थितीत खेळाडूंवर वर्कलोड महत्त्वाचा आहे, असे द्रविडचे मत आहे. बीसीसीआयच्या नव्या धोरणानुसार राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) यंदाच्या आयपीएलदरम्यान खेळाडूंच्या वर्कलोडवर लक्ष ठेवणार आहे.
वर्कलोड मॅनेजमेंट खेळाचा महत्वाचा भाग : द्रविड
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी द्रविड म्हणाला, ‘वर्कलोड मॅनेजमेंट हा आज खेळाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. आम्ही या गोष्टींचा आढावा घेत राहतो. आम्ही वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत खेळाडूंना (रोहित, विराट, केएल राहुल) टी-20 मालिकेसाठी ब्रेक दिला. दुखापती व्यवस्थापन आणि वर्कलोड व्यवस्थापन या दोन भिन्न गोष्टी आहेत. आपण जेवढे क्रिकेट खेळत आहोत ते पाहता नजीकच्या भविष्यात आपल्यासाठी कोणत्या गोष्टीला प्राधान्य आहे याचा समतोल साधावा लागेल. तसेच, मोठ्या स्पर्धांसाठी आमचे मोठे खेळाडू उपलब्ध आहेत याची खात्री करावी लागेल.
सीनियर्स आयपीएलमध्ये सहभागी होतील : द्रविड
द्रविड म्हणाला की, एकदिवसीय विश्वचषक संघात सहभागी असलेले खेळाडू आयपीएलमध्ये खेळतील कारण ते त्यांच्या T20 कौशल्यांचे मूल्यांकन करण्यास मदत करेल. द्रविडने सांगितले की, ‘एनसीए आणि आमची वैद्यकीय टीम आयपीएलच्या बाबतीत फ्रँचायझीच्या सतत संपर्कात असेल आणि जर काही समस्या किंवा दुखापत असेल तर आम्ही त्याची काळजी घेऊ. एखाद्या खेळाडूला दुखापत झाली असेल किंवा इतर कोणतीही चिंता असेल तर त्याला वगळण्याचा अधिकार बीसीसीआयला आहे असे मला वाटते, असं तो म्हणाला.