Rishabh Pant Accident: डोकं, गुडघ्याला दुखापत.. पंतचं करिअर धोक्यात?

मुंबई तक

Rishabh Pant Accident and his Carrer: देहरादून: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारचा आज (30 डिसेंबर) पहाटे अपघात (Car Accident) झाला. ऋषभ पंतला दिल्लीहून उत्तराखंडला जात असतानाच हा अपघात झाला. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. ही बातमी समोर येताच क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे.सध्या ऋषभ पंतवर उपचार सुरू सुरु असून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Rishabh Pant Accident and his Carrer: देहरादून: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारचा आज (30 डिसेंबर) पहाटे अपघात (Car Accident) झाला. ऋषभ पंतला दिल्लीहून उत्तराखंडला जात असतानाच हा अपघात झाला. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. ही बातमी समोर येताच क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे.सध्या ऋषभ पंतवर उपचार सुरू सुरु असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं समजतं आहे, मात्र असं असलं तरीही ऋषभ पंतच्या कारकिर्दीचं काय होणार अशी चिंता त्याचे फॅन्स व्यक्त करत आहेत.

ऋषभ पंत गंभीर जखमी

भारत-बांगलादेश कसोटी मालिकेनंतरही ऋषभ पंत हा मोकळा होता, कारण त्याची श्रीलंका मालिकेसाठी निवड झालेली नाही. त्यामुळे तो उत्तराखंडला म्हणजेच आपल्या घरी जात होता. पण याचवेळी त्याची कार डिव्हायडरला धडकल्याने हा भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतची दुखापत खूप गंभीर आहे.

त्याच्या कपाळावर आणि गुडघ्याला झालेली दुखापत गंभीर असल्याचे डॉ. सुशील नागर यांनी सांगितले. एक्स-रेमध्ये फ्रॅक्चर किंवा गंभीर दुखापत दिसत नाही. मात्र अद्याप एमआरआय आणि इतर रिपोर्ट्स नंतर परिस्थिती स्पष्ट होईल.

ऋषभ पंतच्या कपाळावर दोन जखमा आहेत, एक डाव्या डोळ्याच्या वर आहे. यासोबतच त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर पाठीवरही काही व्रण उठले आहेत. अशा परिस्थितीत ऋषभ पंतला यातून सावरण्यासाठी बराच वेळ लागू शकतो.

हे वाचलं का?

    follow whatsapp