BCCI ची मोठी घोषणा, पुरूष आणि महिला क्रिकेटपटूंना मिळणार समान मानधन

वाचा सविस्तर बातमी काय म्हटलं आहे जय शाह यांनी?
Women cricketers will be paid the same match fee as their male counterparts Says Jay Shah
Women cricketers will be paid the same match fee as their male counterparts Says Jay Shah

BCCI ने मोठी घोषणा केली आहे. भारतीय महिला क्रिकेटर्सनी काही दिवसांपूर्वी झालेल्या आशिया कप २०२२ वर आपलं नाव कोरलं आहे. मागील काही काळात भारतीय महिलांनी त्यांच्या खेळात केलेल्या कमाल सुधारणेनंतर आता जागतिक महिला क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा दिसून येतो आहे. ज्यानंतर आता बीसीसीआयने एक मोठं पाऊल उचललं आहे. महिला क्रिकेटर्सना समान मानधन मिळणार असल्याची घोषणा केली.

जय शाह यांनी नेमकी काय घोषणा केली?

"पुरूष क्रिकेटर्सप्रमाणेच महिला क्रिकेटर्सनाही समान मानधन दिलं जाणार आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ही मोठी घोषणा केली आहे. ज्यानुसार आता कसोटी सामन्यांसाठी १५ लाख, वनडेसाठी ६ लाख तर टी २० सामन्यांसाठी ३ लाख खेळाडूंना मिळणार आहेत"

जय शाह आणखी काय म्हणाले आहेत?

आपण आता लैंगिक समानतेच्या एका नव्या युगात प्रवेश करतोय. अशा परिस्थितीत या धोरणांतर्गत आतापासून पुरुष आणि महिला दोघांसाठी समान मॅच फी असेल. यापुढे महिला खेळाडूंनाही पुरुषांइतकीच मॅच फी दिली जाईल. कसोटी क्रिकेटमधील एका सामन्यासाठी पुरुषांना 15 लाख रुपये मॅच फी दिली जाते. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी पुरुषांना एका सामन्यासाठी 6 लाख रुपये दिले जातात. तर, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक सामना खेळण्यासाठी पुरुषांना 3 लाख रुपये मिळतात. आता, पुरुष खेळाडूंप्रमाणेच ही रक्कम महिला क्रिकेटर्सनाही दिली जाईल.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in