Ajinkya Rahane WTC Final : ‘अजिंक्य’साठी ‘करा किंवा मरा’ची स्थिती!
अजिंक्य रहाणेने रणजी ट्रॉफी आणि नुकत्याच खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या 16व्या हंगामात चांगली कामगिरी करून राष्ट्रीय संघात पुनरागमन केले.
ADVERTISEMENT

Ajinkya Rahane News : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर 7 जूनपासून खेळवला जाणार आहे. जागतिक क्रमवारीत नंबर वन टीम इंडिया आणि नंबर दोन ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या या अंतिम सामन्याची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. अंतिम सामन्यातही सर्वांच्या नजरा टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज अजिंक्य रहाणेवर असणार आहेत.
अजिंक्य रहाणे 18 महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भारतासाठी पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. प्लेइंग-11 मध्ये रहाणेचे स्थान जवळपास निश्चित झाले आहे. रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका गमावल्यानंतर वगळण्यात आले होते.
काऊंटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर पुजाराने राष्ट्रीय संघात आरामात पुनरागमन केले, परंतु राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्यासाठी रहाणेला बराच काळ प्रतीक्षा करावी लागली.
अजिंक्य रहाणेवर असणार खूप दडपण
अखेरीस अजिंक्य रहाणेने रणजी ट्रॉफी आणि नुकत्याच खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या 16व्या हंगामात चांगली कामगिरी करून राष्ट्रीय संघात पुनरागमन केले. तसं पाहिलं तर रहाणेला श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळेच पुनरागमन करता आलं.