Sanjay Raut यांच्यावर ED ची कारवाई का झाली? काय आहे प्रकरण?

संजय राऊत यांची अलिबाग आणि दादरमधील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे
Sanjay Raut यांच्यावर ED ची कारवाई का झाली? काय आहे प्रकरण?

पत्रा चाळ जमीन घोटाळ्या प्रकरणी ईडीने आज शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. ईडीकडून संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे असलेली अलिबाग आणि दादरमधील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची संपत्ती जप्त करण्यात आल्यानंतर ईडीने आता खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली आहे. १,०३४ कोटी रुपयांच्या पत्रा चाळ घोटाळा प्रकरणाचा तपास ईडीकडून सुरू आहे. याच प्रकरणात आता ईडीने संजय राऊत यांची अलिबागमधील आठ ठिकाणची जमीन आणि दादरमधील एक फ्लॅट जप्त केला आहे.

Related Stories

No stories found.