Astrology : बुधादित्य राजयोगाची निर्मिती,‘या’ राशींच्या लोकांचे नशीब पालणार
मुंबई तक
06 Jul 2026 (अपडेटेड: 06 Jul 2026, 12:59 PM)
Astrology : सूर्य ग्रह आणि बुध एकत्रित येतील, तेव्हा आकाशात एक शक्तिशाली राजयोगाची निर्मिती होणार आहे. जो ज्योतिषशास्त्रात बुधादित्य योग म्हणून ओळखला जातो. शुभ संयोग सर्व राशींच्या जीवनात निःसंशयपणे काही उलथापालथ घडवून आणेल, तरी याचा काही राशीतील लोकांवर परिणाम होणार आहे.
ADVERTISEMENT


1/5
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची चाल बदलणार असल्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम हा माणसाच्या जीवनावर होतो. 7 जुलै 2026 रोजी बुद्धि, तर्क आणि बुधाची वक्री अवस्था निर्माण होऊन कर्क राशी सोडून स्वत:च्या राशीत म्हणजेच मिथुन राशीत प्रवेश करेल.


2/5
ग्रहांचा राजा सूर्य ग्रहा आधीपासूनच मिथुन राशीत आहे. सूर्य ग्रह आणि बुध एकत्रित येतील, तेव्हा आकाशात एक शक्तिशाली राजयोगाची निर्मिती होणार आहे. जो ज्योतिषशास्त्रात बुधादित्य योग म्हणून ओळखला जातो. शुभ संयोग सर्व राशींच्या जीवनात निःसंशयपणे काही उलथापालथ घडवून आणेल, तरी याचा काही राशीतील लोकांवर परिणाम होणार आहे.
ADVERTISEMENT


3/5
वृषभ
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी राजयोगाची निर्मिती त्य़ांच्या धनस्थानी आकार देते. आर्थिक परिस्थिती लक्षणीयरित्या सुधारणार आहे. तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. वडिलोपार्जित किंवा कौटुंबिक व्यवसाय सांभाळत आहेत. नोकरीच्या ठिकाणी उच्च पद मिळेल.


4/5
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी हा योग त्यांच्या 11 व्या घरात निर्माण होत आहे. हा काळ आपल्या करिअरसाठी एक छुपे वरदान ठरणार आहे. बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याचा किंवा इच्छित ठिकाणी बदली करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होईल. याच काळात पूर्वी केलेली गुंतवणूक चांगला परतावा मिळवून देईल.
ADVERTISEMENT


5/5
कन्या
कन्या राशीच्या व्यक्तींसाछी हा बुधादित्य योग त्याच्या दहाव्या घरात प्रवेश करतो. त्याच्या प्रभावामुळे कामाच्या ठिकाणी आपली ऊर्जा आणि कार्यनिष्ठा पाहून लोक आश्चर्यचकित होतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. सरकारी नोकरी किंवा मोठ्या स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही चांगली बातमी मिळू शकते.
ADVERTISEMENT











