Astrology : श्रावण महिन्यात शनीची वक्री, 'या' राशींच्या अडचणीत होणार वाढ
मुंबई तक
07 Jul 2026 (अपडेटेड: 07 Jul 2026, 12:53 PM)
Astrology : द्रिक पंचांगानुसार, या वर्षी श्रावण महिना गुरुवारी 30 जुलै 2026 रोजी सुरु होणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या अंदाजानुसार, यंदाच्या वर्षी श्रावण महिना हा विशेष असणार आहे. याच काळात धन आणि करिअरच्या बाबतीत ग्रहस्थितीत महत्त्वपूर्ण बदल होणार आहे, यामुळे अनेक राशींच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT


1/5
द्रिक पंचांगानुसार, या वर्षी श्रावण महिना गुरुवारी 30 जुलै 2026 रोजी सुरु होणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या अंदाजानुसार, यंदाच्या वर्षी श्रावण महिना हा विशेष असणार आहे. याच काळात धन आणि करिअरच्या बाबतीत ग्रहस्थितीत महत्त्वपूर्ण बदल होणार आहे, यामुळे अनेक राशींच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.


2/5
तसेच न्यायची देवता मानणारा शनि देव देखील 26 जुलै 2026 पासून वक्री राहील. शनीच्या या वक्रीमुळे अनेक राशींना अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT


3/5
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना खर्चाने भरलेला असेल. याच काळात या राशीतील लोकांना काही अनपेक्षित आणि मोठे खर्च येऊ शकतात. ज्यामुळे चिंता आणि तणाव वाढेल. यासाठी अधिक काळजी करण्याची गरज नाही, कारण यातून काही सकारात्मक परिणाम मिळतील. यामुळे तुमची परिस्थिती हळूहळू सुधारेल आणि दिलासा मिळेल.


4/5
सिंह
सिंह राशीच्या लोकांना याच काळात करिअर आणि नोकरीमध्ये काही अडचणींचा सामना कराला लागू शकतो. कामाच्या संबंधित अडचणींमुळे तुम्ही नोकरी बदलण्याचा विचारही करू शकता. खर्चावर नियंत्रण ठेवावं आणि काळजीपूर्वक मोठे निर्णय घ्यावेत.
ADVERTISEMENT


5/5
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ महत्त्वपूर्ण आहे. आपल्या तयार केलेल्या योजनेनुसार काम पूर्ण होईलचं असं नाही, यामुळे काही प्रमाणात काम खोळंबू शकते. आपले काम धैर्याने करावे, कसलीही घाई करू नये. पैशांच्याबाबतीत सावधगिरी बाळगावी.
ADVERTISEMENT











