Baba Vanga prediction : बुल्गेरियातील दृष्टिहीन महिला भविष्यवेत्ता बाबा वेंगा यांच्या अनेक भविष्यवाणी आजवर खऱ्या ठरल्या आहेत. अमेरिकेतील 9/11 दहशतवादी हल्ला, 2025 मध्ये म्यानमारमध्ये भूकंप, तसेच राजकुमारी डायना यांच्या मृत्यूची तारीख या सारख्या घटनांबाबत त्यांनी केलेल्या भाकितांनी जगभरात खळबळ उडवली होती. गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किंमतींनी उच्चांक गाठला आणि अचानक त्यात घसरण झाली. त्यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. अशा वेळी बाबा वेंगा यांनी सोन्याबाबत केलेली भविष्यवाणी महत्त्वाची ठरू शकते. आज आपण या बातमीद्वारे त्याच भविष्यवाणीविषयी जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
सोन्याबद्दल बाबा वेंगा यांची भविष्यवाणी काय आहे?
सोनं हे कायम सुरक्षित गुंतवणुकीचं प्रतीक मानलं जातं. मात्र, अलीकडे त्याच्या किंमतींतील चढ-उतारांमुळे लोक चिंतेत पडले आहेत. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया (MCX) वर अलीकडे सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅमला 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचली होती, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की 2026 मध्ये सोन्याच्या किंमती वाढतील की कमी होतील?
10 ग्रॅम सोन्याची किंमत किती होईल?
तज्ञांच्या मते, सध्या जगभरातील भूराजकीय तणाव, टॅरिफ आणि व्यापारयुद्धाच्या अनिश्चिततेमुळे सोन्याच्या किंमती सतत वर-खाली होत आहेत. या परिस्थितीत सोन्याची मागणीही वाढत आहे. बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, आगामी काळात जग हळूहळू मंदीच्या दिशेने वाटचाल करणार आहे. त्यांनी 'क्रॅश-क्रंच' अशी स्थिती येईल, म्हणजेच कॅशचा गंभीर तुटवडा निर्माण होईल, असे भाकीत केले होते.
इतिहास पाहता, अशा आर्थिक संकटाच्या काळात सोन्याच्या किंमती आकाशाला भिडतात. लिक्विडिटीच्या (Liquidity) अभावाचा थेट परिणाम देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर होतो. मंदीच्या काळात सोन्याच्या किंमती नेहमी वाढतात. यापूर्वीच्या जागतिक आर्थिक संकटांत सोन्याच्या भावात 20 ते 50 टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती.
जर 2026 मध्येही अशाच प्रकारचं संकट आलं, तर तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या किंमतींमध्ये 25 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील वर्षीच्या दिवाळीपर्यंत भारतात प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,62,500 ते 1,82,000 रुपयांदरम्यान पोहोचू शकते. हे सोन्याच्या इतिहासातील आणखी एक नवीन विक्रम ठरेल.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT


 होम
होम राजकीय आखाडा
राजकीय आखाडा गुन्ह्यांची दुनिया
गुन्ह्यांची दुनिया शहर-खबरबात
शहर-खबरबात राशीभविष्य-धर्म
राशीभविष्य-धर्म पैशाची बात
पैशाची बात फोटो बाल्कनी
फोटो बाल्कनी हवामानाचा अंदाज
हवामानाचा अंदाज टॉपिक
टॉपिक

 
 









