Personal Finance: 1 एप्रिलपासून होणार 6 मोठे बदल, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

रोहित गोळे

• 07:33 AM • 30 Mar 2025

6 big changes from April 1 2025: 31 मार्च रोजी आर्थिक वर्ष संपल्यानंतर, 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होईल. या काळात अनेक बदल होणार आहेत.

Personal Finance

Personal Finance

Google CTA

Personal Finance Tips: आर्थिक वर्ष 2024-25 हो 31 मार्च रोजी संपणार आहे. 31 मार्चनंतर, 1 एप्रिल रोजी नवीन आर्थिक वर्षात अनेक मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात. केंद्रीय अर्थसंकल्पात केलेल्या अनेक घोषणा लागू होणार आहेत. यापैकी काही घोषणांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. ज्याद्वारे तुमचे Personal Finance चा लेखाजोखा ठरवला जाईल.

हे वाचलं का?

Personal Finance या सीरीजमध्ये, आम्ही तुम्हाला 1 एप्रिलपासून होणाऱ्या त्या 6 मोठ्या बदलांबद्दल सांगणार आहोत. यातील काही बदल तुम्हाला शांती देतील. त्याच वेळी, काही बदल तुमचा ताण वाढवू शकतात.

TDS मधून सूट, गुंतवणुकीवर परतावा मिळवणाऱ्यासाठी गुड न्यूज

केंद्रीय अर्थसंकल्पात, निर्मला सीतारमण यांनी TDS नियमांमध्ये बदल करून मध्यमवर्गीय आणि वृद्धांना दिलासा दिला आहे. यामध्ये, ज्येष्ठ नागरिकांच्या (60 वर्षे किंवा त्याहून अधिक) व्याज उत्पन्नावरील टीडीएस मर्यादा ही पूर्वी वार्षिक 50,000 रुपये होती. आता, ही रक्कम 1 लाख 1 रुपये किंवा त्याहून अधिक झाल्यावर, सरकारला 10 टक्के टीडीएस भरावा लागेल. त्याच वेळी, सामान्य नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा देखील 40,000 वरून 50 हजार रुपये प्रतिवर्ष करण्यात आली आहे.

हे ही वाचा>> Personal Finance: ATM मधून पैसे काढणे होणार महाग, 1 मे पासून मोजावे लागणार 'एवढे' पैसे

आयकरात मोठी सूट

केंद्र सरकारने अर्थसंकल्पीय घोषणांमध्ये पगारदारांना मोठा दिलासा देत 12 लाख 75 हजार रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त केले आहे. यापेक्षा जास्त उत्पन्नासाठी कर स्लॅबमध्येही बदल करण्यात आला आहे. हे कर स्लॅब 1 एप्रिलपासून लागू होतील. म्हणजेच, 1 एप्रिलनंतर 12.75 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात पूर्वीपेक्षा जास्त पैसे येतील.

टोल टॅक्समध्ये मोठी सवलत मिळू शकते

बिझनेस टुडेच्या एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, ते 1 एप्रिलपासून नवीन टोल नियम जाहीर करणार आहेत. त्यांनी संकेत दिले की या नियमांमुळे लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. जर लोकांना मोठ्या प्रमाणात टोल भरण्यापासून दिलासा मिळाला तर त्याचा थेट परिणाम प्रवाशांच्या खिशावर होईल. याशिवाय, मालवाहतुकीचा खर्चही कमी होईल, ज्यामुळे महागाई आणि वाहतूक खर्चावरही परिणाम होईल.

एलपीजी आणि सीएनजीच्या किंमती वाढू शकतात

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीतील चढउतारांमुळे एलपीजी (स्वयंपाकाचा गॅस) आणि सीएनजी (नैसर्गिक गॅस) च्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. सरकारने अद्याप या इंधनांच्या किंमतीत वाढ करण्याची अधिकृत घोषणा केलेली नसली तरी, ग्राहकांनी येत्या काही महिन्यांत किंमती वाढीसाठी तयार राहावे.  जर ही वाढ झाली तर त्याचा परिणाम लोकांच्या खिशावर तसेच वाहतूक आणि मालवाहतुकीच्या खर्चावर दिसून येईल. हा परिणाम बाजारपेठेपर्यंत पोहोचेल.

हे ही वाचा>> Personal Finance: घर खरेदी करावं की भाड्याने घ्यावं.. काय चूक, काय बरोबर? 'हा' फॉर्म्युला ठेवा लक्षात?

बँकिंग शुल्क वाढू शकते

अनेक बँका 1 एप्रिल 2025 पासून काही सेवांवरील शुल्क वाढवू शकतात. यामध्ये एटीएममधून मोफत पैसे काढण्याची मर्यादा कमी करणे, चेकबुक जारी करण्यावरील शुल्कात वाढ करणे आणि किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल दंड यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत, 1 एप्रिलपासून होणाऱ्या बदलांची माहिती तुमच्या बँकेकडून नक्कीच घ्या. 

1 एप्रिलपासून हे व्याजदर बदलतील

1 एप्रिलपासून लहान बचत योजनांवरील व्याजदरात बदल होण्याची शक्यता आहे. सर्व पोस्ट ऑफिस योजनांमध्ये व्याजदर सुधारित केले जातील. पोस्ट ऑफिसमधील व्याजदर तिमाही आधारावर बदलतात. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीम, पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीम (RD), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना (PPF), किसान विकास पत्र, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, सुकन्या समृद्धी खाते योजना यासारख्या इतर योजनांमध्ये गुंतवलेल्या पैशांवर व्याजदरांचा परिणाम होईल.