Mumbai Crime: कर्ज वसूलीच्या नावाखाली रिकव्हरी एजंटने धक्कादायक कृत्य केल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईतील बोरीवली येथे एका वित्त कंपनीच्या रिकव्हरी एजंटने ग्राहकाकडून कर्ज वसूल करण्यासाठी ग्राहकाच्या पत्नीचे मॉर्फ केलेले फोटो ऑनलाइन व्हायरल करण्याची धमकी दिली. इतकेच नव्हे तर, पीडित दाम्पत्याकडून कर्जाची परतफेड न झाल्याने महिलेचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल व्हायरल करण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपीचं नाव तुषार साळुंखे असून नवी मुंबई परिसरातील रहिवासी आहे. आता, प्रकरणाचा तपासादरम्यान आरोपीने इतर काही महिलांसोबत सुद्धा असंच कृत्य केलं आहे का? याचा पोलीस शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
ADVERTISEMENT
इंस्टाग्रामवर अश्लील आणि मॉर्फ फोटो व्हायरल...
मिळालेल्या माहितीनुसार, एका 31 वर्षीय रिअल इस्टेट व्यापाराने डिसेंबर 2024 मध्ये एका अॅपच्या माध्यमातून 1.5 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. मात्र, कुटुंबात आर्थिक समस्या असल्याकारणाने पीडित व्यक्ती कर्ज फेडू शकली नाही. 25 ऑक्टोबर रोजी प्रकरणातील आरोपी तुषारने पीडित व्यापाराला जर कर्ज फेडलं नाही तर त्याची आणि त्याच्या कुटुंबियांची बदनामी केली जाणार असल्याची धमकी दिली. त्यांनंतर, संबंधित व्यापाराच्या माहितीचा वापर करत आरोपीने इंस्टाग्रामवर एक बनावट अकाउंट तयार केलं आणि त्यावर पीडित व्यक्तीच्या पत्नीचे अश्लील आणि मॉर्फ केलेले फोटो पोस्ट केले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ते पीडितेच्या कुटुंबीय आणि ओळखीच्या लोकांपर्यंत पोहोचले, यामुळे कुटुंबियांवर प्रचंड मानसिक तणाव निर्माण झाला.
हे ही वाचा: विकृतीचा कळस! मुंबईत 55 वर्षीय व्यक्तीकडून मांजरीवर बलात्कार, पोलिसांनी आरोपीला घरातून उचललं
आरोपीने केला गुन्हा कबूल
अखेर, कुटुंबियांनी याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. तक्रार नोंदवल्यानंतर, झोन 11 चे डीसीपी संदीप जाधव, वरिष्ठ निरीक्षक मधुसूदन नाईक आणि सायबर युनिटच्या पथकाने मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपीला ट्रेस केलं. या प्रकरणाबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितलं की, कर्जाची वसूली किंवा आर्थिक बाबी या कायदेशीर प्रक्रियेद्वारे सोडवता येऊ शकतात. यासाठी कोणाला मानसिक त्रास देणे किंवा त्यांची बदनामी करणे, हा गंभीर गुन्हा आहे. नागरिकांनी या प्रकरणांमध्ये तातडीने पोलिसांनी मदत घ्यावी. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला आणि आर्थिक दबावातून त्याने हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा: भंडारा हादरला! लग्न जमवून देत नसल्याने 33 वर्षीय मुलाने बापाच्या डोक्यात वीट घातली, जागेवर संपवलं
कांदिवलीत घडली अशीच एक घटना
या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सुद्धा अशीच एक घटना घडल्याची बातमी समोर आली होती. कर्ज वसूल करणाऱ्या एजंटकडून प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागल्याने कांदिवली येथील एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने आत्महत्या केल्याचं वृत्त होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील सूरज जयस्वाल यांनी एका वित्त कंपनीकडून कमर्शिअल वाहनासाठी कर्ज घेतले होते. कुटुंबात आर्थिक अडचण असल्यामुळे पीडित व्यावसायिक घेतलेलं कर्ज फेडू शकला नाही. त्यानंतर, कंपनीच्या रिकव्हरी एजंटने त्याला त्रास देण्यास सुरूवात केली. याच त्रासाला कंटाळून अखेर पीडित तरुणाने कांदिवली येथील गोकुळ नगरमधील त्याच्या घरात आत्महत्या केली.
ADVERTISEMENT











