बाप्पाच्या विसर्जनादिवशी अनर्थ घडला, मंडळाचा कार्यकर्ता झाडावर चढला अन् होत्याचं नव्हतं झालं

Bhayandar shock incidence : भाईंदर येथील मोदी पटेल मार्गावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत मोठी दुर्घटना घडली आहे. मंडळाच्या कार्यकर्त्याला विजेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला.

bhayandar shock incidence

bhayandar shock incidence

मुंबई तक

07 Sep 2025 (अपडेटेड: 07 Sep 2025, 03:14 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

गणेशोत्सव मिरवणुकीत मोठी दुर्घटना

point

विद्युत रोषणाई करताना तरुणाला विजेचा झटका

point

नेमकं काय घडलं?

Bhayandar Shock Incidence : भाईंदर येथील मोदी पटेल मार्गावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत मोठी दुर्घटना घडली आहे. मंडळाच्या कार्यकर्त्याला विजेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. मंडळाच्या कार्यकर्त्याचे नाव प्रतीक शाह (वय 34) याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना 6 सप्टेंबर रोजी शनिवारी घडली आहे. या घटनेनं मंडळातील कार्यकर्त्यांनी शोकही व्यक्त केला आहे. या आनंदाच्याच दिवशी दु:खद घटना घडली.

हे वाचलं का?

हे ही वाचा : जालन्यात वडिलांनीच लेकीचा गळा दाबून केली हत्या, लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचा रचला बनाव, हादरून टाकणारी घटना

विसर्जनादिवशीच मंडळाच्या कार्यकर्त्याला विजेचा शॉक 

अनंत चतुर्दशी दिवशी मंडळाच्या सुवर्ण महोत्सव वर्षाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा विद्युत रोषणाईसाठी झाडावर आणि इमारतींवर विद्युत केबल्स टाकण्यात आल्या होत्या. रात्री 7:45 वाजताच्या सुमारास विसर्जनादिवशी प्रतीक शाहला तीव्र विजेचा धक्का बसला, तेव्हाच एक दुसरा कार्यकर्ता वाचवण्यासाठी आला असता, त्यालाही जबर शॉक बसला. उपस्थितांनी प्रसंगावधानाने बांबूच्या सहाय्याने त्याचा वाचवले.

शाह कुटुंब आणि मंडळावर दुख:चं सावट

मृत्यू झालेले मंडळाचे कार्यकर्ते प्रतीक शाह हे मीरा भाईंदर पश्चिम भागातील वसंत वैभव इमारतीत राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक लहान मुलगा आहे. या अचानक घडलेल्या दुर्घटनेनं शाह कुटुंबावर आणि मंडळावर दुख:चं सावट आहे. या घटनेची नोंद भाईंदर पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून केली आहे. आता पुढील तपास भाईंदर पोलीस करत आहेत.

हे ही वाचा : सप्टेंबर वर्षातील शेवटचं ग्रहण निर्माण होणार, काही राशीतील लोक धनवान होणार, काय सांगतं राशीभविष्य?

दरम्यान, गणेशोत्सव हा पावसाळ्यातच असतो. या पावसामुळे अनेकदा विजेचा झटका लागण्याची अधिक शक्यता असते. तसेच झाडावर अवैधपणे करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई विरोधात माहापालिकेनं अनेकदा अॅक्शनही घेतली होती. तसेच अनेकदा झाडावर विद्युत रोषणाई करू नये असे अनेकदा आवाहनही केलं होतं.

    follow whatsapp