Mumbai News: सध्या, मुंबईसारख्या मोठ्या शहरात रेल्वे प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच, लोकल ट्रेनचं तिकीट काढण्यासाठी मोठ्या रांगा लावण्याऐवजी यूटीएस (UTS) सारख्या मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर करणं मुंबईकरांसाठी सोयीचं ठरतं. आता हीच तिकीट प्रणाली अधिक सोयीस्कर करण्यासाठी व्हॉट्सअॅप सारख्या चॅट आधारित अॅपद्वारे तिकीट काढण्याची सुविधा सुरू करण्याचा विचार सुरू असल्याची बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT
आधुनिक आणि डिजिटल तिकीट प्रणाली
खरंतर, नियमित रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांपैकी 25 टक्के प्रवासी डिजिटल माध्यमातून तिकीट काढत असल्याचं निदर्शनास येत आहे. रेल्वेचं तिकीट काढण्यासाठी मोबाईल अॅप्लिकेशनच्या वापरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. अशातंच, डिजिटल इंडिया योजनेअंतर्गत भारतीय रेल्वे तिकीट प्रणाली आधुनिक आणि डिजिटल करण्याकडे लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी चॅट आधारित तिकिट प्रणाली विकसिक करण्याकडे भर देण्यात येत आहे.
हे ही वाचा: मानवी हाडं, लाल ब्लाउजचा तुकडा आणि ATM कार्ड... मास्क मॅनने सांगितलं शेकडो मृतदेहांचं 'ते' रहस्य!
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली माहिती
ही सुविधा सुरु करण्यासंदर्भात विविध संस्थांसोबत नुकतीच एक बैठक झाली. त्यावेळी यासंबंधी सर्व बाबी विचारात घेऊन आणि सगळ्या गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर निविदा प्रक्रियेबद्दल विचार करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले की, "प्रवाशांच्या सोयीसाठी अशी प्रणाली विकसित करण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, यासाठी अनेक पर्यायांचा विचार सुरू असून चॅट बेस तिकीट प्रणाली त्याचाच भाग आहे."
मेट्रोच्या तिकीटासाठी व्हॉट्सअॅपचा वापर...
या डिजिटल तिकीट प्रणालीच्या माध्यमातून प्रवाशांना कॅशलेस आणि जलद तिकीट उपलब्ध करण्यात येत आहेत. सध्या, मेट्रोचं तिकीट काढण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर करण्यात येत आहे. तिकीट खिडकीवर असलेला क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर चॅट उघडतं. त्यावर फक्त हाय मेसेज केल्यानंतर कुठलं तिकीट काढायचं यासाठी पर्याय दिले जात असून पैसे भरल्यानंतर डिजिटल तिकीट उपलब्ध होतं.
हे ही वाचा: दुसरी पत्नी पहिल्या पत्नीवर खूप जळायची..पतीचाच काटा काढला! हातपाय बांधून वीजेच शॉक दिला अन्..
विशेष काळजी
सध्या, यूटीएसच्या माध्यमातून क्युआर पद्धतीच्या प्रणालीचा गैरवापर होत असल्याकारणाने ते सगळं रोखण्यासाठी नवीन प्रणाली विकसित करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
