Ganesh Festival : गणपती बाप्पाचं आज 27 ऑगस्ट रोजी आगम झालं. या आगमानापूर्वी मुंबई महापालिकेनं गणपती मंडळांना तसेच मुंबईकरांना महत्त्वाची माहिती दिली होती. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील 12 पूल धोकादायक असल्याचं बोललं जातंय. तर काही पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरु आहेत. तर काही पुलांची कामे ही पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी आता महापालिकेनं गणपती बाप्पांचे आगमन करताना आणि विसर्जन करताना पुलांवरून जाताना सावधगिरी बाळगावी असे सांगितले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मनोज जरांगेंनी केली गणपती बाप्पांची आरती, मुंबईकडे कूच करण्याआधी फडणवीसांनी खेळली खेळी?
मुंबई महापालिका आणि मुंबई पोलीस महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. मध्य रेल्वे येथील घाटकोपर भागातील उड्डाणपूल, करी रोड येथील उड्डाणपूल, आर्थर रो़ड उड्डाणपूल असेल, तसेच चिंचपोकळी, भायखळा रेल्वे उड्डाणपूल, मरीन लाईन्स, सँडहर्स्ट रोड, फॉकलँड, केनडी रेल्वे उड्डाणपूल, महालक्ष्मी रेल्वे उड्डाणपूल, दादर येथील लोकमान्य टिळक रेल्वे उड्डाणपूल, इतर काही रेल्वे उड्डाणपूल हे धोक्यात असल्याचं मुंबई महापालिकेनं सांगितलं आहे.
वरीलपैकी इतर काही रेल्वे उड्डाणपूल हे धोक्यात आहेत. त्यामुळे या वरील रेल्वे उड्डाणपूलावरून गणपती बप्पांचे आगमन करताना, तसेच येणाऱ्या काही दिवसांमध्ये विसर्जन करताना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी महापालिकेनं वेळोवेळी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महापालिका प्राशसनाने केले आहे.
हे ही वाचा : मुंबईतील गणेशोत्सवात AI कॅमेऱ्याद्वारे गुन्हेगारांवर करडी नजर, हजारो मुंबई पोलिसांची सुरक्षेसाठी ऑन ड्यूटी
सबंधित धोक्याच्या पुलांवर एकावेळी अधिक वजनाचा भार पुलाला पेलणार नाही, याची भाविकांनी आणि मुंबईकरांनी काळजी घ्यावी. या पुलांवर ध्वनिक्षेपकाचा वापर करू नये. तसेच आपण जोवर पुलावर आहात तोवर कोणीही नाचकाम करू नये. पुलावरून खाली उतरल्यानंतरच उत्सवाचा आनंद घ्यावा. पोलीस आणि बृहन्मुंबई महापालिकेनं दिलेल्या सूचनेचं पालन करावं, असं आवाहन करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
