BMC Election Exit Poll : महापालिका निवडणुकीचं मतदान दि : 15 जानेवारी रोजी पार पडलं. या निवडणुकीत सर्वात चर्चेत राहिलेली महापालिका म्हणजेच मुंबई महापालिका आहे. याच मुंबई महापालिकेच्या एक्झिट पोलचा अंदाज आता समोर आला आहे. या आकड्यांमध्ये महायुती ही वरच्या स्थानावर असल्याचं दिसत आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर ठाकरे बंधू असतील असं जेडीएस या एक्झिट पोलनं सांगितलं आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचा क्रमांक आहे. ही निवडणूक 227 जागांवर लढवण्यात आली होती. या एकूण जागांमध्ये चाळी, झोपड्या आणि इमारतीतून एकूण कोणाला किती मतदान मिळण्याची शक्यता आहे, याचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे,
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पोलिसांचा फ्लॅटमध्ये छापा, खोलीत तरुणासह महिला नग्न अवस्थेत, सर्वत्र कंडोम, समीर सय्यद पत्नीसोबत...
जेडीएस एक्झिट पोल
जेडीएस एक्झिट पोलनुसार, महायुतीमध्ये 127 ते 154 अशी आकडेवारी समोर आली आहे. तसेच ठाकरे बंधू यांची आकडेवारी ही 44-64 एवढी असण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये 16-25 अशी आकडेवारी असल्याचं सांगण्यात येत आहे.
अॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोल
अॅक्सिस माय इंडिया एक्झिटपोलनुसार, महायुती 131-151 जागांवर विजय मिळवेल असा अंदाज वर्तवला. तसेच ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात 58-68 एवढ्या जागांवर विजयी मिळवू शकतात असा अंदाज आहे. काँग्रेस आणि वंचित ही युती 12-16 जागांवर विजय मिळवण्याची शक्यता आहे. यामध्ये महायुती विजयी होण्याची शक्यता असल्याचा अॅक्सिस माय इंडिया एक्झिटपोलनं अंदाज वर्तवला आहे.
हे ही वाचा : मतदान केंद्रावर लोकांची गर्दी असतानाच क्रोबा दिसला अन् खळबळ उडाली, नवी मुंबईत काय घडलं? पाहा VIDEO
यापैकी महायुतीला झोपड्यांमधून 33 %, चाळीत 40 %, इमारतीत 51%
ठाकरे बंधूंना झोपड्यांमधून 35 %, चाळीत 33 %, इमारतीत 29 %
काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीत झोपड्यांमधून 17 %,चाळीत 14, इमारत 08
इतर - झोपड्यांमधून 15 %, चाळीत 13 %, इमारतीत 12 % अशी आर्थिक निकषानुसार मतांच्या अंदाजे टक्क्यांची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT











