कल्याण: वाहनांच्या लांबलचक रांगा, कर्णकर्कश्श हॉर्नांचा आवाज, ध्वनी व वायू प्रदूषणामुळे आज (21 ऑगस्ट) कल्याण शहराचा अक्षरशः श्वास कोंडला. सकाळपासून प्रेम ऑटो ते शहाड मार्गावर सुरू झालेली संथ गतीची वाहतूक दुपारपर्यंत भयानक कोंडीत बदलली. परिणामी अवघ्या काही मिनिटांचा प्रवास नागरिकांना तब्बल 2 तासांत करावा लागत आहे. सगळ्यात भीषण बाब म्हणजे शाळेत जाणारे किंवा शाळेतून घरी येणारे चिमुकले हे तब्बल 4-4 तास ट्रॅफिकमुळे बसमध्ये अडकून पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
कल्याणमध्ये नेमकं घडलं तरी काय?
कोंडीचा कहर फक्त शहाड परिसरापुरता मर्यादित न राहता ती हळूहळू शहरभर पसरली. मुरबाड रोड, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, वालधुनी पूल, रामबाग, सहजानंद चौक, बिर्ला कॉलेज मार्ग, चिकणघर चौक या ठिकाणी वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला. शाळा सुटण्याच्या वेळी ही कोंडी आणखी गंभीर बनली. परिणामी छत्रपती शिवाजी महाराज चौक, आग्रा रोड, लाल चौक, शंकरराव चौक, अहिल्याबाई चौक, बाजारपेठ परिसरासह अंतर्गत रस्तेही वाहनांनी तुडुंब भरले. या अभूतपूर्व वाहतूक कोंडीसमोर वाहतूक पोलीस देखील हतबल झाल्याचं पाहायला मिळालं.
हे ही वाचा>> आरारारारा खतरनाक! 'ब्युटी पार्लरवाल्यांना नरकात पाठवा..', महिलेच्या भन्नाट मेकअपचा Viral Video पाहून नेटकरी भडकले!
वालधुनी ते रामबाग आणि पुढे मुरबाड रोडपर्यंत आज सकाळपासून भयंकर वाहतूक कोंडी झाली आहे. तब्बल 2 किलोमीटरपेक्षा जास्त लांबच लांब वाहनांची रांग लागल्याने वाहनचालक अक्षरशः हैराण झाले होते. या कोंडीत शालेय बसेस सुद्धा अडकल्या असून विद्यार्थ्यांना वेळेत शाळेत पोहोचणे कठीण झाले आहे. अनेक प्रवासी वेळेत आपल्या इच्छित स्थळी पोहोचू शकले नाहीत. सर्वात गंभीर म्हणजे, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवा वाहनांना देखील मार्ग काढणे अवघड झाले आहे. त्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वाहतूक पोलिसांकडून कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र वाढत्या वाहनसंख्येमुळे परिस्थिती अधिकच बिकट होत असल्याचे चित्र आहे.
ट्रॅफिक पोलीसही झाले हतबल, वाहतूक कोंडी सोंडविण्यात ठरले अपयशी!
संपूर्ण शहरात एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जामची ही पहिलीच घटना आहे. कारण आतापर्यंत कल्याणकरांना एवढ्या भीषण ट्रॅफिकचा कधीही सामना करावा लागला नव्हता. यामुळे वाहतूक कोंडी कशी सोडवावी असा प्रश्न वाहतूक पोलिसांना देखील पडला होता.
हे ही वाचा>> मुंबईची खबर: मॉल म्हणावं की स्विमिंग पूल? नागरिकांनी रस्त्यावरच मारल्या बेडूक उड्या..ओबेरॉय मॉलची 'अशी' अवस्था कधी पाहिली नसेल
ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर अशी भीषण परिस्थिती उद्भवल्याने आगामी गणेशोत्सव काळात वाहतूक व्यवस्थेचं काय होणार? अशा सवाल करत कल्याणकरांनी भीती व्यक्त केली आहे. वाढत्या वाहतुकीमुळे शहरात श्वास घ्यायलाही अवघड झाल्याने नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. ही वाहतूक कोंडीची समस्या कोण, कशी आणि कधी सोडवणार? असा प्रश्न आता शहरातील नागरिक मोठ्या संतापाने विचारत आहेत.
ADVERTISEMENT
