Ladaki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दिवाळीच्या आधीच एक गूड न्यूज मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. बुधवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना सप्टेंबरचा हप्ता देण्यासाठी वित्त विभागाने बुधवारी 410.30 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिल्याचं वृत्त समोर आलं आहे. यामुळे राज्यभरातील पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचे हप्ते मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ADVERTISEMENT
'या' महिलांना मिळणार नाही लाभ...
हा मंजूर झालेला निधी अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांसाठी असल्याची घोषणा करण्यात आली होती. या योजनेच्या निधीला मंजूरी देताना सामाजिक न्याय विभागाअंतर्गत देण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू नये, याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. राज्य सरकारच्या न्याय आणि विशेष सहाय्यता विभागाने बुधवारी (8 ऑक्टोबर) यासंबंधी एका सरकारी निर्णयाची घोषणा केली.
हे ही वाचा: Govt Job: 'या' बँकेकडून पोस्ट विभागात निघाली मोठी भरती! थेट अर्ज करा अन्... काय आहे पात्रता?
3,960 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता
या सरकारी निर्णयानुसार, विभागाअंतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 3,960 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर, वित्त विभागाकडून काही दिवसांपूर्वी पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबरचा हप्ता देण्यासाठी एक पत्र पाठवण्यात आलं आणि निधीच्या वितरणाची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली. यानुसार, पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबरचे हप्ते देण्यासाठी वित्त विभागाने बुधवारी निधी मंजूर केला.
हे ही वाचा: लॉजवरच्या रुममध्ये होते गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड, अचानक नको ते घडलं आणि दोघांचाही गेला जीव!
महिला आणि बाल विकास विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय
या निधीला मंजूरी देताना सामाजिक न्याय विभागाने महिला आणि बाल विकास विभागाला एक महत्त्वपूर्ण सल्ला दिली. यानुसार, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थी महिलांची संख्या प्रदान करण्याचं सुचवण्यात आले. उपलब्ध निधी फक्त अनुसूचित जाती आणि नव-बौद्ध लाभार्थ्यांसाठी वापरला जाणार असल्याची खात्री करण्याची सूचनाही करण्यात आली. याशिवाय, विभागाअंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्त पेन्शन योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही, याबाबत लक्ष देण्याचं सुचवण्यात आलं.
ADVERTISEMENT
