Mumbai Crime : मुंबईतील मलाडमध्ये एका तरुणाने विकृतीची परिसिमा पार केली आहे. दोन महिन्यांच्या श्वानावर 20 वर्षाच्या तरुणाने लैंगिक अत्याचार केले आहेत. या प्रकरणी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल केल्याचं सांगण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. कुरार पोलिसांनी सांगितलं की, रविवारी सायंकाळी एका सार्वजनिक शौचालयात नराधमाने असं हैवानी कृत्य केलं. अत्याचार करणाऱ्या तरुणाचं नाव विकास बेसाकर पासवान असे आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : दुकानाबाहेर महिलेच्या लेहंग्यातून पडला तूपाचा डबा, झडती घेताच 30 हजारांचं सामान... चित्रपटाला लाजवेल अशी घटना
श्वानाच्या पिल्लाला शौचालयात नेत अत्याचार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विकास बेसाकर पासवानने लहान पिल्लाला शौचालयात नेले आणि नंतर त्याच्यावर अत्याचार केला. नंतर त्याला मारहाण देखील केली होती. या घटनेची माहिती एका प्राणी प्रेमी असलेल्या गीता पटेल यांनी दिली आहे. त्यांनी पोलिसांना फोन करून घटनेची माहिती पोलिसांना दिली होती.
श्वानाचे पिल्लू डॉक्टरांच्या निगराणीखाली
या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पासवनाच्या मुसक्या आवळल्या. पिल्लाला गंभीर अवस्थेत वाचवण्यात आल्याचं वृत्त आहे. पिल्लाला एका प्राण्यांच्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेनं शौचालयाबाहेर मोठा गोंधळ उडाल्याचं चित्र होतं.
हे ही वाचा : मुंबईचं महापौर पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव, भाजपच्या गोटातून 'या' नगरसेविकेचं नाव सर्वात आघाडीवर
त्याच्यावर भारतीय न्याय संहिताच्या कलमांन्वये आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे आता निसर्गाप्रमाणेच प्राणी देखील सुरक्षित आहेत का? असा प्रश्न समोर आला आहे.
ADVERTISEMENT











