मुंबई: महिलेचा लग्नास नकार, होणाऱ्या सुनेनं सासूचे मॉर्फ फोटो व्हायरल केले अन्..

मुंबई तक

24 Jun 2026 (अपडेटेड: 24 Jun 2026, 08:24 PM)

Mumbai Crime: मुंबईच्या शिवडी परिसरातून लज्जास्पद प्रकार उघडकीस आला आहे. लग्नासाठी नकार दिल्याने तरुणीने होणाऱ्या सासूचे फोटो मॉर्फ केले आणि सोशल मीडियावर पोस्ट केले. पोलिसांनी आरोपी होणाऱ्या सुनेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत आहेत.

Mumbai Crime

Mumbai Crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

होणाऱ्या सुनबाईनं सासूचे फोटो पॉर्फ करून शेअर केले

point

महिलेला मानसिक ताण निर्माण झाला

Mumbai Crime: मुंबईच्या शिवडी परिसरातून लज्जास्पद प्रकार उघडकीस आला आहे. लग्नासाठी नकार दिल्याने तरुणीने होणाऱ्या सासूचे फोटो मॉर्फ केले आणि सोशल मीडियावर पोस्ट केले. पोलिसांनी आरोपी होणाऱ्या सुनेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत आहेत. तरुणीची ओळख झैनब अशी पटली आहे. झैनबने असं किती लोकांसोबत कृत्य केलं याचा पोलीस तपास करत आहेत. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : गेस्ट हाऊसमध्ये एक महिला आणि 6 पुरूष, 'नको तसलं' रॅकेट अन्..

होणाऱ्या सुनबाईनं सासूचे फोटो पॉर्फ करून शेअर केले

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी महिला जनैब  आपल्या प्रियकरासोबत प्रेमविवाह करणार होती. मात्र, प्रियकराच्या आईने झैनबला लग्नासाठी नकार दिला. यामुळे जैनब नाराज झाली आणि तिच्या मनात तरुणाच्या आईचा राग येऊ लागला होता. तिने रागाच्याभरात जनैबचे काही मॉर्फ व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. यामुळे तरुणाच्या आईची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. 

महिलेला मानसिक ताण निर्माण झाला

पीडित महिलेचं म्हणणं असं की, जैनबकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेले मेसेज आणि काही फोटोंमुळे सामाजिक आणि मानसिक त्रास होऊ लागला होता. त्यांनी आरोप केला की, जैनबने महिलेला खूप बदनाम केलं होतं. तिला सतत मानसिक तणावाचा सामना करावा लागत होता. 

हे ही वाचा : मुंबई लोकलमध्ये मर्डर करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी उचललं

महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता, पोलिसांनी प्रकरण समजून घेतलं आणि गुन्हा दाखल केला. भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या आक्षेपार्ह मॉर्फ व्हिडिओची चौकशी केली होती.