Mumbai Crime : मुंबई : पुण्यात एका क्लास वन सरकारी अधिकाऱ्याने आपल्याच पत्नीचा लैंगिक छळ केला होता. त्याने पत्नीला पैशाची मागणी केली होती. पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याने पतीनेच आपल्या पत्नीचे अश्लील व्हिडिओ बनवले होते.त्यानंतर अशीच काहीशी घटना पुण्यानंतर मुंबईत घडली आहे. मुंबईतील म्हाडाचे उपनिबंधक अधिकाऱ्याच्या पत्नीने आपल्याच नवऱ्याच्या जाचाला आणि छळाला कंटाळून टोकाची भूमिका घेतली आहे. ही घटना मुंबईतील आकुर्ली येथील आहे. म्हाडाचे उपनिबंधक बापू कटरे यांच्या पत्नी रेणू कटरे यांनी लैंगिक छळ आणि हुंड्याच्या कारणामुळे टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली, असं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : लग्नानंतर नवविवाहित वधू माहेरी आली, कुटुंबातील लोक बाहेर गेले अन् तरुणी प्रियकरासोबत...नेमकं काय घडलं?
नेमकं प्रकरण काय?
रेणू कटरे या आपल्या पतीसह कांदिवली येथील हायफाय सोसायटीतील रहिवासी होते. रेणू कटरे यांनी आत्महत्येच्या पूर्वी अनेकदा आपल्या भावाकडे सासरी होणाऱ्या छळाबाबत सांगितलं. माझा त्रास कधीच थांबणार नाही, मी त्यांना नकोय, असे रेणू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी उच्चपदस्थ अधिकारी आहे. तुझी माझ्यासोबत राहायची लायकी नाही, असं म्हणत बापू कटरे यांनी पत्नीला अनेकदा हिणवले. रेणू कटरे यांची सासूदेखील कमी हुंडा दिल्याने सतत टोमणे मारायची. रेणू कटरे यांच्यावर माहेरच्यांकडून पैसे आणण्यास जबरदस्ती करू लागले होते.
हुंड्याची मागणी
लग्न झाल्यानंतर रेणू कटरे यांच्या वडिलांनी 8 तोळ्यांच्या बांगड्या रेणूला दिल्या होत्या. लग्नात 12 लाख, त्यानंतर 10 लाख रुपये रेणू यांच्या सासरच्यांना दिले होते. आताही रेणू कटरेंचा मानसिक छळ सुरूच होता. त्यांना लाठीकाठीने मारहाण केली, असा आरोप पीडितेच्या भावाने केला आहे. त्यानंतर याच वादावरून त्यांच्या कुटुंबातर्गत एक बैठक घेण्याचं ठरवलं असता, सासरच्यांकडून बैठकीस नकार दिला. रेणूंची मानसिक स्थिती बिघडली असता, 26 जुलै रोजी रेणूंनी आपल्या भावाला फोनद्वारे संपर्क करत सविस्तर माहिती सांगितली. माझा हा त्रास कधीही थांबणारा नसल्याचं पीडित रेणूनं आपल्या भावाला सांगितलं.
हेही वाचा : Extramariital Affairs पती रिक्षा चालवून कुटुंबाचं भरायचा पोट, पत्नी लहान मुलांना घराबाहेर खेळायला सांगायची, घरात परपुरूषासोबत...
त्यानंतर रेणू यांनी आपल्या उपचार तज्ज्ञालाही सांगितलं की, सासरचे बैठक घेणं टाळत आहेत. मी त्यांना नकोय, एवढं बोलून रेणूनं फोन कट केला. त्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा फोन केला असता, रेणूंनी फोनला कसलंही प्रत्युत्तर दिलं नाही. त्यानंतर डॉक्टरांनी बापू कटरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रेणूने स्वत:ला फ्लॅटमध्ये कोंडून घेतल्याचं सांगितलं. या प्रकरणी पोलिसांकडून समतानगर पोलीस ठाण्यात आरोपी बापू कटरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
