Mumbai Crime: मुंबईतील चारकोप पोलिसांकडून 41 वर्षीय व्यक्तीला आपल्या पत्नीचा गळा दाबून हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी (20 सप्टेंबर) पती आणि पत्नीमध्ये झालेल्या वादातून ही धक्कादायक घटना घडली. संबंधित जोडप्याच्या अल्पवयीन मुलाने ही घटना पाहिली आणि त्याने पोलिसांना पूर्ण घटना सांगितली. आरोपी त्याच्या पत्नीकडून ओडिशामध्ये त्याच्या गावी जाण्यासाठी पैसे मागत होता, असं सांगितलं जात आहे. त्याच्या पत्नीने त्याला पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपी संतापला आणि त्याने रागाच्या भरात आपल्या पत्नीचा गळा दाबून तिचा खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपीचं नाव दास राणा असून तो मजूर म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
गावी जाण्यासाठी केली पैशांची मागणी...
पोलिसांच्या माहितीनुसार, दास राणा आणि त्याची पत्नी हिमंद्री हे दोघे कांदिवली येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत मजूर म्हणजेच कामगार म्हणून काम करत होते. ते जवळपास वर्षभरापासून एकत्र काम करत होते. बांधकामाच्या ठिकाणी इतर बरीच लोकं तात्पुरत्या घरात राहून मजूर म्हणून काम करत होते. शनिवारी दुपारी 2:30 च्या सुमारास, आरोपी दास राणा याने त्याच्या पत्नीला त्याच्या गावी जाण्यासाठी पैशांची गरज असल्याचं सांगितलं.
हे ही वाचा: मुंबईची खबर: आजपासून मुंबई मेट्रो 4 च्या चाचणीला सुरूवात... 'या' प्रवाशांना होणार अधिक फायदा
चादरीने गळा दाबून हत्या
ओडिशा येथील आपल्या गावी जाण्यासाठी पतीने पत्नीकडे पैशांची मागणी केली. पण, पत्नीने पैसे देण्यास नकार दिला आणि त्यावेळी दोघांमध्ये मोठा वाद पेटला. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दोघांच्याही भांडणात आरोपी पतीने आधी पत्नीला मारहाण केली आणि नंतर चादरीने तिचा गळा दाबून तिची हत्या केली.
हे ही वाचा: Govt Job: 'बँक ऑफ बडोदा'मध्ये 'या' पदांसाठी निघाली मोठी भरती! लाखोंचा पगार अन्... लवकरच करा अप्लाय
मुलाने पोलिसांना सगळंच सांगितलं
घटनेच्या वेळी, आरोपी आणि पीडितेचा मुलगा तिथेच उपस्थित होता. त्यावेळी त्याने आपल्यासमोर घडलेली पूर्ण घटना बघितली. घटनास्थळी, आवाज ऐकून इतर कामगार सुद्धा तिथे जमले आणि त्यांनी आरोपीचा दरवाजा ठोठावला. आरोपीने दरवाजा उघडला तेव्हा त्याची पत्नी बेशुद्ध पडली होती. तिला रुग्णालयात नेण्यात आलं आणि तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांच्या चौकशीदरम्यान, सुरूवातीला आरोपीने आपला गुन्हा कबूल करण्यास नकार दिला. मात्र, त्याच्या मुलाने घडलेली सर्व घटना पोलिसांनी सांगितली. आता पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
