रेल्वेखाली येऊन तरुणाने केली आत्महत्या, मुंबईतील जोगेश्वरी रेल्वेस्थानकावरील घटना, कुटुंबीय म्हणाले...

Mumbai News : मुंबईतील जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनच्या ट्रॅकवर एका तरुणाने आत्महत्या केली आहे. ही घटना शनिवारी घडली असून या प्रकरणात अंधेरी रेल्वे पोलिसांनी घटनेची माहिती दिली.

Mumbai News

Mumbai News

मुंबई तक

• 02:34 PM • 27 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनच्या ट्रॅकवर तरुणाची आत्महत्या

point

नैराश्यात येऊनच हे टोकाचं पाऊल? 

point

पोलिसांनी चक्र फिरवत केला धक्कादायक दावा

Mumbai News : मुंबईतील जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनच्या ट्रॅकवर एका तरुणाने आत्महत्या केली आहे. ही घटना शनिवारी घडली असून या प्रकरणात अंधेरी रेल्वे पोलिसांनी घटनेची माहिती दिली. मृत तरुणाचे नाव भावेश शिंदे (वय 30) असे आहे. तो एका मेडिकल स्टेअरमध्ये काम करत होता. या प्रकरणात आरोपीचा अकस्मितपणे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : दिल्ली हादरली! तरुणी विद्यापीठात जात होती, ओळखीच्याच तरुणाने थेट तिच्यावर अॅसिड फेकलं, नंतर तरुणीचा...

10 वाजण्याच्या सुमारास रेल्वे ट्रॅकवर  मृतदेह

तरुण भावेश शिंदे हा जोगेश्वरी पूर्व येथे मोगरपाडा येथील रहिवासी आहे. तो सकाळी 7: 30 वाजता कामासाठी घरातून बाहेर पडला. संबंधित प्रकरणात रेल्वे पोलिसांनी सांगितलं की, सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास रेल्वे ट्रॅकवर त्याचा मृतदेह आढळला. तरुणाचा मृतदेह अगदी छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला होता. तपासातून तरुणाने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. 

नैराश्यात येऊनच हे टोकाचं पाऊल? 

आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबियांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याबाबतची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस म्हणाले की, तरुणाचा मोबाईन फोन जप्त करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणात अधिकची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याने नैराश्यात येऊनच हे टोकाचं पाऊल उचललं आहे का, याचा ते तपास करत आहेत. 

हे ही वाचा : पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार अखेर रद्द, बिल्डर विशाल गोखलेंनी मेल पाठवला; आता रवींद्र धंगेकर म्हणाले...

आत्महत्येपूर्वी तरुणाने कुटुंबियांना आणि सहकाऱ्यांना काही विचित्र गोष्टी सांगितल्या होत्या. यामुळे ही नैराश्यात येऊन केलेली आत्महत्या असल्याचा संशय अधिककरून बळावला गेला आहे. त्याने कुटुंबाला सांगितलं की,  त्याचे शेवटचे दिवस आता जवळ आले आहेत आणि त्याच्या सर्व नातेवाईकांनी त्याला भेटावे. त्याने त्याच्या मालकाला असेही सांगितलं की, 24 ऑक्टोबर हा त्याचा शेवटचा कामाचा दिवस असेल आणि तो दुसऱ्या दिवशी कामावर येणार नाही. तरुणाने केलेल्या वक्तव्यावर त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं की, त्याने मद्यपान करूनच असे वक्तव्य केले असावे.

    follow whatsapp