मुंबईची खबर: मुंबईतील मतदारांनो! आता, मतदानाची वेळ केली कमी... 'हा' नवा बदल जाणून घ्या

आता मुंबईतील मतदारांसाठी मतदान करण्याची वेळ कमी करण्यात आल्याने मुंबईतील बऱ्याच मतदान केंद्रांवर गर्दी पाहायला मिळणार आहे. काय आहे हा नवा बदल? सविस्तर जाणून घ्या.

मतदानाची वेळ कमी करण्याचा निर्णय..

मतदानाची वेळ कमी करण्याचा निर्णय..

मुंबई तक

• 04:53 PM • 14 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील मतदारांसाठी मोठी बातमी!

point

आता, मतदानाची वेळ कमी होणार...

point

'हा' नवा बदल जाणून घ्या

Mumbai News: उद्या म्हणजेच 15 जानेवारी रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूका पार पडतील. मुंबईत जवळपास 1 कोटींहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आता मतदारांसाठी मतदान करण्याची वेळ एक तास कमी करण्यात आल्याने मुंबईतील बऱ्याच मतदान केंद्रांवर गर्दी पाहायला मिळणार आहे. मुंबई महापालिकेसाठी नागरिकांना सकाळी 7:30 वाजेपासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, मुंबईत एकूण 29 नगरपालिकांसाठी मतदानाची हीच वेळ असणार आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. खरं तर, गेल्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत होती. 

हे वाचलं का?

मुंबई महानगरपालिकेची तयारी 

मुंबई महानगरपालिकेने महानगरपालिका मुख्यालयात निवडणुकीच्या तयारीची माहिती देण्यात आली. यावेळी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी (कोकण विभाग) फरोघ मुकादम आणि इतर महानगरपालिका अधिकारी उपस्थित होते. राज्य निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करून निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. मतदान केंद्रांवर मूलभूत सुविधा, मतदारांसाठी आवश्यक सुविधा, अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता तसेच रॅम्प व मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. 

हे ही वाचा: पुणे तिथे काय उणे! मतदारांना वाटल्या 'चांदीच्या' भेटवस्तू, पण निघाल्या खोट्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रताप...

मुंबईत किती मतदार? 

मुंबईत एकूण 1 कोटी 3 लाख 44 हजार 315 मतदार आहेत. त्यातील 55 लाख 16 हजार 707 पुरुष आणि 48 लाख 26 हजार 509 महिला मतदार असून 1 हजार 99 हे इतर मतदार आहेत. तसेच, 2 हजार 278 ठिकाणी 10 हजार 231 मतदान केंद्रे बनवण्यात आली आहेत. या केंद्रांवर सकाळी 7:30 वाजेपासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान करता येईल. गगराणी यांच्या माहितीनुसार, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान, दुपारनंतर बऱ्याच मतदान केंद्रांवर गर्दी पाहायला मिळाली होती. आता, महापालिका निवडणुकीतही असंच होण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा: पुण्यात खळबळ! डिनर पार्टीत जमले मित्र, पण अचानक प्रेमसंबंधातून वाद अन् नायजेरिअन नागरिकाची निर्घृण हत्या...

मुंबईत एकूण 1 लाख 68 हजार डुप्लिकेट मतदार असून आतापर्यंत 48,628 लोकांनी दोनदा मतदान न करण्याचे अंडरटेकिंग (आश्वासन) सादर केलं आहे आणि वेगळ्या मतदान केंद्राची माहिती देखील दिली आहे. उर्वरित डुप्लिकेट मतदार मतदान केंद्रावर पोहोचताच, जर त्यांचं नाव मतदार यादीत डुप्लिकेट असल्याचं आढळलं तर त्यांचे दोन पुरावे तपासले जातील आणि त्याच ठिकाणी मतदान करण्यासाठी त्यांच्याकडून हमीपत्र देखील घेतलं जाईल. 

व्होटर इन्फॉर्मेशन स्लिप 

सध्या, व्होटर इन्फॉर्मेशन स्लिप वाटण्याची प्रोसेस सुरू असून त्यामध्ये नाव, पत्ता, व्होटर लिस्टमध्ये सेक्शन नंबर, मतदान केंद्राचं नाव आणि रूम नंबर अशी महत्त्वाची माहिती असेल. प्लॅनिंगनुसार, 12 जानेवारीपर्यंत मुंबईतील प्रत्येक पात्र मतदारापर्यंत वेळेवर आणि निर्धारित वेळेत पोहोचावे यासाठी सुमारे 60 लाख मतदार माहिती स्लिप (व्होटर इन्फॉर्मेशन स्लिप) घरोघरी वाटण्यात आल्या. 

    follow whatsapp