Mumbai News: मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच कबुतरांना खायला दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील माहीम पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथे एका अज्ञात व्यक्तीने चालत्या वाहनातून कबुतरांना खायला दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
अद्याप आरोपीची ओळख पटली नसल्याने अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या आदेशात न्यायालयाने कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालण्यास बंदी असल्याचे आणि या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते.
कबुतरांना खायला दिल्याबद्दल FIR
कबुतरांना खायला दिल्याबद्दल पोलिसांनी एफआयआर नोंदविण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. मुंबई पोलिसांनी माहीम परिसरात पहिला एफआयआर नोंदविला असून प्रशासन आता या मुद्द्यावर अधिक कडक भूमिका घेत आहे. 30 जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयात प्राणीप्रेमींनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. यादरम्यान, न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला सार्वजनिक ठिकाणी धान्य म्हणजेच दाणे फेकण्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले होते.
हे ही वाचा: मुंबईची खबर: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! प्लॅटफॉर्मवर गर्दी कमी होणार... 'ही' खास ट्रेन लवकरच धावणार
कोर्टाचे महापालिकेला आदेश
शहरातील कबूतरखान्यातील कबूतरांची गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक पावलं उचलून कठोर कारवाई लागू करण्याचे कोर्टाने महापालिकेला आदेश दिले होते. कोर्टाच्या सुनावणीदरम्यान, प्रशासनाने स्पष्ट बंदी घातली असूनही, लोक अजूनही कबुतरखान्यात कबुतरांना खायला घालताना दिसत असल्याचं कोर्टाने सांगितलं. याच आदेशाच्या संबंधित याचिका फेटाळण्यात आल्यानंतर परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाल्याचं समोर आलं. आता या मुद्द्यावर महापालिका कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांचं कर्तव्य बजावण्यापासून रोखलं जात आहे.
हे ही वाचा: "मुंबई मराठी माणसांची नाही इथं...' भाजप नेते नारायण राणेंचं वदग्रस्त वक्तव्य, नेमका रोष कोणावर?
यानंतर, हायकोर्टाकडून बीएससीला आदेश करण्यात आला आहे की निर्देशांचे उल्लंघन केल्यास कबुतरांना खायला घालणाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी.
ADVERTISEMENT
