मुंबईची खबर: 21 किमी लांब वॉटर टनल प्रोजेक्टला ग्रीन सिग्नल! आता, मुंबईकरांची पाणी टंचाई दूर होणार...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) महत्त्वाकांक्षी 21 किमी लांबीच्या जल बोगदा बोगदा प्रकल्पाला कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) कडून मान्यता मिळाल्याचं वृत्त समोर आलं आहे. बीएमसीने 21 किलोमीटर लांबीचा हा बोगदा प्रकल्प बॅकअप प्लॅन म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

• 04:23 PM • 27 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

21 किमी लांब वॉटर टनल प्रोजेक्टला ग्रीन सिग्नल!

point

आता, मुंबईकरांची पाणी टंचाई दूर होणार...

Mumbai News: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) महत्त्वाकांक्षी 21 किमी लांबीच्या जल बोगदा बोगदा प्रकल्पाला कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) कडून मान्यता मिळाल्याचं वृत्त समोर आलं आहे. बीएमसीने 21 किलोमीटर लांबीचा हा बोगदा प्रकल्प बॅकअप प्लॅन म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. बीएमसीचा महत्त्वाकांक्षी 21 किलोमीटरचा जल बोगदा प्रकल्प ठाण्यातील येवई आणि कशेळी यांना पूर्व उपनगरातील मुलुंडशी जोडेल. या बोगद्याच्या बांधकामासाठी अंदाजे 4500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे आणि तो दोन टप्प्यात पूर्ण केला जाईल. 

हे वाचलं का?

मुंबईचा पाणीपुरवठा बळकट होईल

बीएमसीच्या या प्रोजेक्टमुळे मुंबईचा पाणीपुरवठा बळकट होईल, तसेच प्रस्तावित कशेळी-मुलुंड बोगद्यामुळे मुंबई-नाशिक महामार्गाचा विस्तारही सुलभ होईल. बीएमसी येवई जलाशयापासून कशेळीपर्यंत एक बोगदा देखील बांधेल. येवई-कशेली बोगद्याची एकूण लांबी 14 किमी असून कशेळी-मुलुंड बोगद्याची लांबी 7 किमी असल्याची माहिती आहे. तसेच, त्याची खोली 110 मीटर असेल. हा प्रकल्प पुढील सहा महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. बीएमसीने 14 किलोमीटर लांबीच्या येवई-कशेळी बोगदा आणि 7 किलोमीटर लांबीच्या कशेळी-मुलुंड बोगद्यासाठी मार्च 2024 मध्ये निविदा काढल्या होत्या. 

हे ही वाचा: महालक्ष्मी अन् तुळजाभवानीचं दर्शन घेऊन विठुरायाच्या दर्शनाला निघाले, पण वाटेत काळाचा घाला; चौघांचा मृत्यू

पूर्व उपनगरांना चांगला पाणीपुरवठा... 

आता, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने कशेळी (भिवंडी) ते मुलुंड (ऑक्ट्रॉय नाका) पर्यंत बीएमसीच्या जलमार्ग प्रकल्पासाठी कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) मंजुरी दिली आहे. टनल बोरिंग मशीन (TBM) चा वापर करून या बोगद्याची निर्मिती केली जात आहे. या बोगद्याचा एकूण व्यास 5.3 मी असून तो येवाई मास्टर बॅलेन्सिंग रिझर्वॉयर (YMBR) ते भिवंडीच्या कशेळी पर्यंत असेल. हा बोगदा 150 ते 180 मीटर खोलीवर बांधला जाणार असून यामुळे पूर्व उपनगरांना चांगला पाणीपुरवठा होईल. 

हे ही वाचा: शक्तीवर्धक गोळ्या घेऊन बनायचा हैवान, अत्याचाराला कंटाळलेल्या पत्नीने पतीला दुधात विष घालून संपवलं

BMC शहराचा पाणीपुरवठा बळकट करण्यासाठी इतर बोगदा प्रकल्पांचा देखील विचार करत आहे. यामध्ये मरोळ आणि माहीम, मलबार हिल आणि क्रॉस मैदान तसेच वेरावली आणि यारी रोड दरम्यानचे संभाव्य दुवे तसेच गुंडवली आणि भांडुप कॉम्प्लेक्स दरम्यानचं कनेक्शन समाविष्ट आहेत. याव्यतिरिक्त, लहान बोगदे पवई, वेरावली आणि घाटकोपर यांना जोडतील, ज्यामुळे शहराचे पाणी वितरण नेटवर्क आणखी सुधारेल.

    follow whatsapp