मुंबईची खबर: गणेशोत्सवासाठी तब्बल 474 कोटी रुपयांचा विमा! पुजारी, स्वयंपाकी, मंडप... नेमकं काय-काय केलं कव्हर?

मुंबईतील जीएसबी सेवा मंडळ गणेशोत्सवासाठी चर्चेत असल्याचं दिसत आहे. या मंडळाचं चर्चेत येण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे विमा! या मंडळाने गणेशोत्सवासाठी आतापर्यंतचे सर्वात मोठं विमा कव्हर घेतलं आहे.

मुंबईतील गणेशोत्सवासाठी 474 कोटी रुपयांचा विमा!

मुंबईतील गणेशोत्सवासाठी 474 कोटी रुपयांचा विमा!

मुंबई तक

• 05:56 PM • 21 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील गणेशोत्सवासाठी तब्बल 474 कोटी रुपयांचा विमा!

point

मुंबईतील 'हे' गणेशोत्सव मंडळ आता चर्चेत..

Mumbai News: मुंबईत बऱ्याच दिवसांपूर्वी गणेशोत्सवाची तयारी सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. हा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी काहीतरी वेगळं आणि नवीन करण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळी मुंबईतील जीएसबी सेवा मंडळ गणेशोत्सवासाठी चर्चेत असल्याचं दिसत आहे. या मंडळाचं चर्चेत येण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे विमा! या मंडळाने गणेशोत्सवासाठी आतापर्यंतचे सर्वात मोठं विमा कव्हर घेतलं आहे. पारस मंडळाने 474.46 कोटी रुपयांचा विमा घेतला आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी विमा पॉलिसी असून गेल्या वर्षी 400 कोटी रुपयांचा विमा घेण्यात आला होता.

हे वाचलं का?

विम्याच्या रकमेत वाढ होण्याचं कारण

सोनं आणि चांदीच्या दागिन्यांची वाढती किंमत आणि अधिकाधिक स्वयंसेवक तसेच पुजारी यांचा समावेश हेच या विम्याच्या रकमेत वाढ होण्याचं मोठं कारण असल्याचं सांगितलं जात आहे. न्यू इंडिया इन्श्योरन्स द्वारे हे ऑल-रिस्क इन्श्योरन्स पॅकेज प्रदान केलं जातं. यात सोनं, चांदी आणि मौल्यवान रत्ने तसेच वैयक्तिक अपघात, आग आणि भूकंपामुळे होणारे नुकसान म्हणजेच सार्वजनिक जबाबदाऱ्या यांसारखे धोके समाविष्ट आहेत.

काय-काय केलं कव्हर? 

एकूण विम्याच्या रकमेपैकी सर्वात मोठा भाग म्हणजे 375 कोटी रुपयांचा वैयक्तिक अपघात कव्हर आहे. यामध्ये मंडळाचे स्वयंसेवक, पुजारी, स्वयंपाकी, नोकर आणि सुरक्षा कर्मचारी यांचा समावेश आहे. याशिवाय मंडप, स्टेडियम आणि भाविकांवर 30 कोटी रुपयांचे सार्वजनिक दायित्व विमा लागू होईल. या कार्यक्रमाच्या स्थळासाठी 43 लाख रुपयांचं अग्निशमन आणि स्पेशल रिस्क कव्हर घेण्यात आलं आहे. आग आणि भूकंपापासून संरक्षणासाठी 2 कोटी रुपयांचं कव्हर कायम ठेवण्यात आलं आहे.

हे ही वाचा: 'माझे पती आजारी होते म्हणून..." दाजी आणि मेव्हणीने मिळून केली हत्या! अनैतिक संबंध अन् समोर आलं वेगळंच सत्य..

मंडळाच्या अध्यक्षांनी दिली माहिती...

यावेळी दागिन्यांच्या विम्याच्या रकमेत मोठी वाढ झाली आहे. 67 कोटी रुपयांचं ऑल-रिस्क कव्हर फक्त दागिन्यांसाठी असून 2024 मध्ये ते 43 कोटी रुपये आणि 2023 मध्ये 38 कोटी रुपये होते. मंडळाचे अध्यक्ष अमित पाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे आणि स्वयंसेवक-पुजारी यांचा कव्हरेजमध्ये समावेश झाल्याने पॉलिसीची रक्कम वाढली आहे.

हे ही वाचा: Govt Job: रेल्वेत नोकरी करायची आहे? मग 'पश्चिम रेल्वे'च्या 'या' भरतीची संधी सोडू नका... लवकरच करा अप्लाय

तसेच, यावर्षी गणपती बाप्पाला 66 किलो सोने आणि 336 किलो चांदीच्या दागिन्यांनी सजवण्यात येणार आहे. मंडळाचा गणेशोत्सव 27 ते 31 ऑगस्ट दरम्यान आयोजित केला जाईल. यावेळी देणगीदारांसाठी स्वतंत्र प्रवेश व्यवस्था आयोजित करण्यात आली आहे आणि गर्दीच्या व्यवस्थापनासाठी एका व्यावसायिक एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे.


 

    follow whatsapp