Mumbai News: सीएसएमटी (CSMT) ते ठाणे दरम्यान मेट्रो सेवा सुरू होणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026 मध्ये सीएसएमटी (CSMT) ते ठाणे दरम्यान मेट्रो सुरू करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2026 च्या अखेरीस किंवा 2027 च्या सुरुवातीला मेट्रो-4 कॉरिडोर आणि याच्याशी कनेक्ट 58 किमी लांब मार्गावर मेट्रो सेवा सुरू होणार आहे. यामध्ये वडाळा, घाटकोपर, कासारवडवली, गायमुख दरम्यान तयार होणाऱ्या मेट्रो 4, मेट्रो-4 A आणि वडाळा ते सीएसएमटी दरम्यान मेट्रो लाइन 11 यांचा समावेश आहे. सोमवारी (22 सप्टेंबर) ठाण्यात मेट्रो-4 कॉरिडोरच्या 4.4 मार्गावर ट्रायल रनच्या सुरूवातीला मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे.
ADVERTISEMENT
तब्बल 21 लाख नागरिकांना मेट्रोने प्रवास...
58 किमी लांब असलेली ही लाइन देशातील सर्वात मोठी मेट्रो लाइन असून ती मुंबई शहर, उपनगर आणि पश्चिमी उपनगरांना जोडण्याचं काम करणार असल्याचं सांगितलं जात आहे. 35 किमी लांब मेट्रो-4 कॉरिडोर सुरू झाल्याने दररोज 13.42 प्रवाशांना मेट्रोने प्रवास करता येणार असल्याचं अंदाज बांधला जात आहे. तसेच, मेट्रो सीएसएमटीला कनेक्ट झाल्यानंतर तब्बल 21 लाख नागरिकांना मेट्रोने प्रवास करता येणार आहे. मेट्रो कारशेडसाठी मोगरपाडा येथे 45 एकर जमीन उपलब्ध करण्यात आली आहे.
हे ही वाचा: Govt Job: 'इंजिनीअरिंग'चं शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी मिळवा सरकारी नोकरी! कसं ते सविस्तर जाणून घ्या
अडीच वर्षांची प्रतिक्षा
ट्रायल रनच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जवळपास अडीच वर्षे मेट्रो प्रॉजेक्टचं काम बंद ठेवण्याचे आरोप केले. पृथ्वीराज चौहान राज्याचे मुख्यमंत्री असताना मेट्रोचा आराखडा तयार करते वेळी ठाणे शहराला मेट्रोपासून दूर ठेवण्यात आल्याचा आरोप शिंदे यांनी केला. 2014 मध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मेट्रो-4 ला मंजूरी दिली. 1853 मध्ये ठाणे ते मुंबई दरम्यान पहिली ट्रेन धावली होती. आता तब्बल 172 वर्षांनंतर ठाण्यात मेट्रो धावत आहे.
हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबई अंडरग्राउंड मेट्रो- 3 लवकरच प्रवाशांच्या सेवेत! CSMT, चर्चगेट आणि मंत्रालय... रूटबद्दल सविस्तर माहिती
'इथे' सुरू झालं ट्रायल रन...
पहिल्या फेजच्या 10 किमी संपूर्ण मार्गिकेवर आवश्यक सुविधा नसल्याने सोमवारी केवळ गायमुख ते विजय गार्डन पर्यंत ट्रायल रनची सुरूवात झाली आहे. येत्या दीड ते दोन महिन्यांत पूर्ण 10 किमी मार्गिकेवर ट्रायल रन सुरू होण्याची अपेक्षा आहे.
ADVERTISEMENT
