मुंबईची खबर: मुंबई अंडरग्राउंड मेट्रो- 3 लवकरच प्रवाशांच्या सेवेत! CSMT, चर्चगेट आणि मंत्रालय... रूटबद्दल सविस्तर माहिती
बहुचर्चित मेट्रो 3 च्या मार्गिकेचं बांधकाम पूर्ण झालं असून यामुळे प्रवाशांना मेट्रो अंडरग्राउंड म्हणजेच भूमिगत मार्गाने थेट दक्षिणेकडील टोकापर्यंत पोहोचता येईल.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबई अंडरग्राउंड मेट्रो- 3 लवकरच प्रवाशांच्या सेवेत!

जाणून घ्या, रूटबद्दल सविस्तर माहिती...
Mumbai News: बहुचर्चित मेट्रो 3 च्या मार्गिकेचं बांधकाम पूर्ण झालं असून यामुळे प्रवाशांना मेट्रो अंडरग्राउंड म्हणजेच भुयारी मार्गाने थेट दक्षिणेकडील टोकापर्यंत पोहोचता येईल. अंडरग्राउंड मेट्रोचं काम पूर्ण झाल्यामुळे दक्षिण मुंबईतील प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार असल्याचं सांगितलं जात आहे. यासोबतच, उत्तर-मध्य मुंबई ते दक्षिण मुंबईत येणाऱ्या लोकांनाही याचा फायदा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
सुरुवातीला सीप्ज (आरे)-बीकेसी-कुलाबा म्हणून ओळखली जाणारी मेट्रो वर्तमानात जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर जेव्हीएलआर (JVLR)- सीप्ज (SEEPZ) आरे कॉलनी-विमानतळ-BKC-दादर-सिद्धिविनायक मंदिर-वरळी या मार्गावर धावते आणि आता अंतिम टप्प्यात ती नेहरू सायन्स सेंटर- महालक्ष्मी- कालबादेवी- सीएसएमटी- चर्चगेट- मंत्रालय- कफ परेड या मार्गावर धावेल. ही फेज लवकरत सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ही मेट्रो मार्गिका उत्तर- मध्य मुंबईमध्ये आरे, सिप्जला दक्षिण मुंबईमध्ये कफ परेडला जोडेल. यामुळे बऱ्याच मार्गांवर आरामदायी प्रवास होणार आहे.
इतर कनेक्शन्स
मेट्रो ३ वर 'मरोळ नाका' नावाचे एक स्टेशन असून हे स्टेशन घाटकोपर-वर्सोवा-घाटकोपर मेट्रो 1 मार्गावरील याच नावाच्या स्टेशनशी जोडलेलं आहे. त्यामुळे, अंधेरी पूर्व, मरोळ आणि वर्सोवा येथील रहिवासी मेट्रो 1 आणि मेट्रो 3 ने दक्षिण मुंबईला देखील पोहोचू शकतात. तसेच, त्याचप्रमाणे, मेट्रो 2 A मधील 'अंधेरी पश्चिम' आणि मेट्रो 7 मधील 'गुंडावल्ली' हे देखील मेट्रो 1 शी जोडलेले आहेत. दहिसर, एकसर, मालाड, कांदिवली, ओशिवरा, दिंडोशी, गोरेगाव, जोगेश्वरी येथील लोक मेट्रो 2A किंवा मेट्रो 7 ने प्रवास करून कमी वेळेत दक्षिण मुंबईला पोहोचू शकतात आणि 'मरोळ नाका' स्थानकावरून मेट्रो 3 ने आरामदायी एसीमध्ये प्रवास करू शकतात.
हे ही वाचा: मुंबई: गावी जाण्यासाठी पत्नीकडे मागितले पैसे, विरोध करताच चादरीने गळाच दाबला अन्...
कात्रीच्या आकाराचं ट्रॅक जंक्शन
कफ परेड हे मेट्रो 3 वरील सर्वात दक्षिणेकडील स्टेशन आहे. या ठिकाणी ट्रॅक एकमेकांना जोडल्यामुळे, ते कात्रीच्या आकाराचे दिसते. 18 ते 20 मीटर जमिनीखाली ही रचना अगदी आश्चर्यकारक दिसते. मेट्रो 3 ची निर्मिती करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून प्रसिद्ध झालेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.