Mumbai News: सर्वसामान्य नागरिकांसाठी 'म्हाडा'च्या बंपर लॉटरीची मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) नाशिक मंडळाकडून नाशिक शहरी भागातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत 478 सदनिका विक्रीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली आहे. 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत ही लॉटरी आयोजित करण्यात आली आहे. या लॉटरीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि पारदर्शक असल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली.
ADVERTISEMENT
अधिकृत वेबसाइट किंवा अॅपवरून थेट अर्ज...
म्हाडाच्या या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी लोकांनी कोणत्याही मध्यस्थांच्या मदतीशिवाय म्हाडाच्या अधिकृत वेबसाइट किंवा अॅपवरून थेट अर्ज करण्याचे आवाहन उपाध्यक्षांनी केलं आहे. म्हाडाने विकसित केलेली ही प्रणाली अतिशय सोपी आणि सुरक्षित असल्यामुळे यात फसवणूक होण्याची शक्यता नाही. हे फ्लॅट्स कमी उत्पन्न असलेल्या अर्जदारांसाठी उपलब्ध असल्याची माहिती आहे. नाशिक बोर्डाचा हा या वर्षीचा तिसरा ड्रॉ असून याआधी बोर्डाने 379 फ्लॅट्स, 105 दुकाने आणि 32 भूखंड वितरित केली आहेत. ही घरे 15.51 लाख ते 27.10 लाख रुपयांच्या किमतीत उपलब्ध असतील.
हे ही वाचा: Govt Job: रेल्वेत नोकरी करण्यासाठी प्रयत्न करताय? RRB कडून 'या' पदांसाठी निघाली भरती...
कधीपर्यंत कराल अर्ज?
नाशिक बोर्डाच्या या सोडतीसाठी ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया 4 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता सुरू झाली असून 3 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत लोक अर्ज करू शकतात. या सोडतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 3 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत आहे. ऑनलाइन ठेव रक्कम भरण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2025 रात्री 11.59 वाजेपर्यंत आहे. तुम्ही 4 ऑक्टोबर 2025 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT च्या माध्यमातून देखील पैसे भरू शकता. अंतिम यादी 17 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12.00 वाजता प्रकाशित केली जाईल.
हे ही वाचा: पत्नीसोबत झाला वाद अन् रागाच्या भरात केली हत्या, सासू-सासऱ्यांवर सुद्धा केला हल्ला अन् स्वत: गळफास घेत... नेमकं कारण काय?
कुठे मिळणार ड्रीम हाऊस?
तसेच, या ड्रॉमध्ये गंगापुर शिवार (50), देवलाली शिवार (22), पाथर्डी शिवार (64), म्हसरूल शिवार (196), नासिक शिवार (14) आणि आगर तकली शिवार (132) मध्ये फ्लॅट्स उपलब्ध आहेत. इच्छुक अर्जदारांनी कोणत्याही एजंट किंवा मध्यस्थीच्या मार्फत अर्ज न करता म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करावेत, असे आवाहन संजीव जयस्वाल यांनी केले आहे.
ADVERTISEMENT
