Mumbai News: मुंबईमध्ये कोस्टल रोडची निर्मिती झाल्यानंतर सुद्धा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) आणि छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी या मार्गांना जोडणाऱ्या एका अंडरग्राउंड रस्त्याचं बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास 24,000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हा रस्ता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) कडून बांधला जाणार असून प्राधिकरणाने या प्रोजेक्टसाठी प्राथमिक टेंडर जाहीर केलं आहे.
ADVERTISEMENT
'इंटीग्रेटेड सबवे कनेक्टिंग'
गेल्या सोमवारी उपमुख्यमंत्री आणि MMRDA चे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी या योजनेची घोषणा केली. त्यानंतर, लगेच मंगळवारी टेंडर जाहीर करण्यात आलं. हे टेंडर म्हणजेच निविदा सल्लागार स्वरूपाची असून यासाठी सल्लागाराने प्रकल्पाचा तांत्रिक-व्यवहार्यता अभ्यास आणि सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करणे आवश्यक आहे. 10 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर हा टेंडरचा कालावधी असून MMRDA कडून यासाठी 17.50 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या योजनेला मुंबई कोस्टल रोड ते बीकेसी बुलेट ट्रेन स्टेशन आणि तिथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 पर्यंत 'इंटीग्रेटेड सबवे कनेक्टिंग' म्हटलं गेलं आहे.
योजनेचे तीन टप्पे
पहिला टप्पा- वरळी सी ब्रिज, बीकेसी, बुलेट ट्रेन स्टेशन आणि विमानतळाकडे जाणारा 16 किमी लांबीचा चार पदरी रस्ता
दुसरा टप्पा: पूर्व-पश्चिम कनेक्शनसाठी 10 किमी लांबीचा चार पदरी रस्ता
तिसरा टप्पा: उत्तर-दक्षिण कनेक्शनसाठी 44 किमी लांबीचा सहा पदरी रस्ता
हे ही वाचा: Ladaki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी गूड न्यूज! सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा...
रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे
एकीकडे नव्या रस्त्यांचं बांधकाम सुरू आहे तर दुसरीकडे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पाहायला मिळत आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे लोकांची मोठी गैरसोय होत आहे तसेच, याच कारणामुळे हजारो लोकांचे अपघात झाले असल्याच्या बातम्या पाहायला मिळतात. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवादरम्यान अलिबाग-वडखळ रस्त्यावर खड्डे पडले होते, त्यानंतर बांधकाम विभागाने दिवाळीपर्यंत दुरुस्तीसाठी डेडलाइन दिली आहे असून शेकाप आंदोलनानंतर विभागाकडून हे आश्वासन देण्यात आलं आहे.
हे ही वाचा: Govt Job: 'या' बँकेकडून पोस्ट विभागात निघाली मोठी भरती! थेट अर्ज करा अन्... काय आहे पात्रता?
मंगळवारी पेजारी चेकपोस्टवर शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली "चक्का जाम" (रस्ता रोको) आंदोलन करण्यात आलं. अखेर बांधकाम विभागाने दिवाळीपूर्वी रस्ता दुरुस्त करण्याचं लेखी आश्वासन दिलं. यादरम्यान, अलिबाग-पेण मार्गाचे कंत्राट मावळमधील एका कंत्राटदाराला देण्यात आले आहे ज्याला या परिसराची काहीच माहिती नाही. खड्डे भरण्यासाठी 13 कोटी रुपये खर्च येणार असल्याचं वृत्त आहे.
ADVERTISEMENT
