Mumbai News: नुकतंच प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रो लाईन 3 म्हणजेच 'अॅक्वा लाईन' वर पादचाऱ्यांचा मार्ग अधिक बळकट आणि सुकर करण्यासाठी, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) कडून मुख्य सबवे बांधण्याच्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. हे सबवे मेट्रो स्थानकांना महत्त्वाच्या परिसरांशी, सार्वजनिक ठिकाणांशी आणि आगामी प्रकल्पांशी थेट जोडले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
कुठे बनणार दोन भुयारी मार्ग
प्रस्तावित दोन भुयारी मार्गांपैकी पहिला सबवे वरळीतील नेहरू सायन्स सेंटर हे मेट्रो स्टेशनला कनेक्ट होईल. हा भुयारी मार्ग महालक्ष्मी रेसकोर्स, वरळी प्रोमेनेड आणि नेहरू तारांगण पर्यंत बांधला जाणार आहे. हे कोस्टल रोडवर विकसित होत असलेलं नवीन पार्क आणि पूर्वीच्या वरळी डेअरीच्या जागेवर बांधलं जाणारं व्यावसायिक केंद्र यांना देखील जोडणार असल्याचं सांगितलं जात आहे. हा सबवे 1.6 किमी लांब असणार आहे. तसेच, दुसरा सबवे हा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) स्टेशनला जोडला जाणार असून तो 1.4 किमी लांब असेल. हा भुयारी मार्ग थेट मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन टर्मिनलला कनेक्ट होणार असल्याची माहिती आहे. हा मार्ग बीकेसी परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणांना जोडला जाणार असल्याने हा परिसर एक मुख्य इंटरचेंज हब म्हणून विकसित होणार आहे.
हे ही वाचा: Govt Job: सरकारी नोकरीच्या प्रयत्नात आहात? मग, 'नाबार्ड'च्या 'या' भरतीसाठी लवकरच करा अप्लाय...
3 किमी लांब सबवे
या दोन्ही भुयारी मार्गांची एकूण लांबी 3 किमी पेक्षा अधिक असणार आहे. एमएमआरसीएल 'एमएमआरसीएल'चे संचालक आर रमणा या प्रोजेक्टबाबत म्हणाले की, "पादचाऱ्यांसाठी एकूण 3 किमी लांबीच्या या दोन वेस्टिब्युल्स किंवा सबवेसाठी डीपीआर तयार करण्यासाठी आम्ही लवकरच एक एजन्सी नियुक्त करणार आहोत. ही एजन्सी सबवेच्या निर्मितीच्या काळात प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून कार्य करणार आहे."
हे ही वाचा: आयटी इंजिनिअर नवऱ्यावर पत्नीचा अत्याचार, सहा महिने तुरुंगात बसून लिहिलं पुस्तक, पुरुष हक्क दिनाची मन हेलावणारी घटना
वरळी डेअरीसाठी ग्रीन सिग्नल...
या पूर्ण योजनेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे वरळी डेअरीचा भव्य प्लॉट. हा भूखंड आता व्यावसायिक वापरासाठी खुला केला जाणार असल्याचे सरकारी स्तरावरील संकेत दर्शवतात. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य नगरविकास विभाग विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली (DCPR) मध्ये आवश्यक बदल केले जातील आणि वरळी डेअरी भूखंडाचे आरक्षण व्यावसायिक वापरासाठी रूपांतरित केलं जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ला या क्षेत्राचे नियोजन प्राधिकरण म्हणून आधीच नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे, या जागेवरील पुनर्विकासाच्या कामाला गती मिळण्याची अपेक्षा असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT











