मुंबईची खबर: प्रतिक्षा संपली! बेलासिस फ्लायओव्हरचं काम पूर्ण, लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार...

जानेवारी 2026 च्या पहिल्या आठवड्यात बेलासिस फ्लायओव्हर जनतेसाठी खुला होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ताडदेव, नागपाडा आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा प्रवास अधिक सुविधानजक होणार आहे.

बेलासिस फ्लायओव्हरचं काम पूर्ण

बेलासिस फ्लायओव्हरचं काम पूर्ण

मुंबई तक

• 02:37 PM • 21 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

बेलासिस फ्लायओव्हरचं काम पूर्ण

point

लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार...

Mumbai News: मुंबईकरांसाठी एक दिलासाजनक बातमी समोर आली आहे. जानेवारी 2026 च्या पहिल्या आठवड्यात बेलासिस फ्लायओव्हर जनतेसाठी खुला होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ताडदेव, नागपाडा आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा प्रवास अधिक सुविधानजक होणार आहे. बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी एप्रिल 2026 ही फ्लायओव्हरची डेडलाइन निश्चित करण्यात आली होती. मात्र, कंत्राटदारांनी मिळून हा प्रोजेक्ट लवकर पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. आता, मुंबईतील रहिवासी बेलासिस उड्डाणपुलावरून प्रवास करू शकणार आहेत. 

हे वाचलं का?

बेलासिस फ्लायओव्हरचं नाव बदललं जाणार...

रेल्वे अधिकाऱ्यांकडून एनओसी (NOC) जारी झाल्यानंतर, बीएमसी बेलासिस फ्लायओव्हर लवकरच खुलं करण्याची तयारी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जसं कार्नाक ब्रिजचं नाव बदलून 'सिंदूर' ठेवण्यात आलं, तसंच बेलासिस फ्लायओव्हरचं नाव बदललं जाणार असल्याची माहिती आहे. खरं तर, बेलासिस फ्लायओव्हर ब्रिटीश राजवटीत बांधण्यात आला होता आणि म्हणूनच त्याला हे नाव देण्यात आले आहे. मात्र, या नावाचा भारतीय संस्कृतीशी किंवा महाराष्ट्राच्या ऐतिहासिक शौर्याशी काहीही संबंध नाही. म्हणून, या उड्डाणपुलाचं नाव बदलण्याचा विचार केला जात आहे.  

हे ही वाचा: Govt Job: सुप्रीम कोर्टात नोकरीची सुवर्णसंधी! महिन्याला 1 लाख रुपये पगार अन्... कधीपर्यंत कराल अर्ज?

जून 2024 मध्ये जुना पूल पाडून नव्या पुलाच्या बांधकामाचं काम वेगानं सुरू झालं. या प्रोजेक्टसाठी बीएमसीकडून 70 कोटी तर रेल्वे विभागाकडून 40 कोटी रुपये देण्यात आले. केबल-स्टेड डिझाइनसह हा 350 मी. लांबीचा आधुनिक फ्लायओव्हर तयार केला जात आहे. 

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली माहिती 

सप्टेंबर 2024 मध्ये या पुलाच्या बांधकामाचे आदेश देण्यात आले आणि सतत प्रयत्न तसेच काटेकोर नियोजनामुळे हा प्रकल्प नियोजित वेळेच्या खूप आधी पूर्ण झाला. बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर याबाबत म्हणाले की, गेल्या काही महिन्यांपासून ते प्रकल्पाच्या प्रगतीवर वैयक्तिकरित्या लक्ष ठेवून आहेत. त्यांनी सांगितलं की, बीएमसी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमआरआयडीसी) या तीन संस्थांमधील समन्वय हेच प्रोजेक्ट लवकर पूर्ण होण्याचं प्रमुख कारण आहे. तसेच, कामाच्या दरम्यान कंत्राटदाराला आलेल्या कोणत्याही समस्या त्वरित सोडवण्यात आल्या.

    follow whatsapp