Thane Crime: ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील मोहाने परिसरात भाच्याने आपल्या मामाची निर्दयीपणे हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. कौटुंबिक वादातून ही भयानक घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीला ताब्यात घेऊन प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
रागाच्या भरात मामाची हत्या...
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेतील मृताची ओळख 40 वर्षीय मरियप्पा राजू नायर अशी समोर आली आहे. तसेच, हत्येच्या आरोपाखाली अटक झालेल्या तरुणाचं नाव गणेश रमेश असल्याचं सांगितलं जात आहे. पीडित व्यक्ती आणि आरोपी तरुणात गेल्या बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू होते आणि हा वाद कालांतराने वाढत गेला. घटनेच्या दिवशी, दोघांमधील वाद टोकाला पोहोचला आणि रागाच्या भरात आरोपी गणेशने त्याच्या मामाला घराजवळील परिसरात फरफटत नेलं आणि जिन्यावर डोकं आपटून त्याची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा: जरांगेचा डावच उलथवला, तर बच्चू कडूंच्या आडून फडणवीसांनी 'असे' मारले एका दगडात 5 पक्षी?
सीसीटीव्हीमध्ये घटना कैद
या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलं असून त्यामध्ये पीडित व्यक्ती स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. आरोपी गणेश त्याच्या मामाला निर्दयीपणे मारहाण करत होता आणि त्यामध्ये पीडित मरियप्पाचा मृत्यू झाला. खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तातडीने पुढील कारवाई सुरू केली. घटनास्थळाची तपासणी केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच, आता पोलीस परिसरातील लोकांची तपासणी करत आहेत.
हे ही वाचा: राष्ट्रीय पातळीवर नाव कमावलेल्या कबड्डीपटूची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या, नेमकं कारण काय?
केवळ एका तासातच आरोपीला अटक
घटनेनंतर केवळ एका तासातच आरोपी गणेशला कल्याण स्टेशनवरून अटक करण्यात आली. मामाच्या हत्येनंतर, आरोपी शहर सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. सध्या, पोलीस आरोपीची चौकशी करत असल्याचं सांगितलं जात आहे. कौटुंबिक संपत्ती आणि घरगुती वादातून ही घटना घडल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं. या प्रकरणासंदर्भात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात असून आरोपीवर कारवाई केली जात असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT











