ठाणे: "लग्न करण्यासाठी आधी 21 वर्षांचा हो..." कुटुंबियांचं बोलणं मनाला लागलं अन् 19 वर्षीय तरुणाने संपवलं आयुष्य!

ठाण्यातील एका 19 वर्षीय तरुणाने फाशी घेत आत्महत्या केल्याचं वृत्त आहे. पीडित तरुणाला एका मुलीसोबत लग्न करायचं होतं.

ठाण्यातील 19 वर्षीय तरुणाने संपवलं आयुष्य!

ठाण्यातील 19 वर्षीय तरुणाने संपवलं आयुष्य!

मुंबई तक

• 11:36 AM • 03 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

"लग्न करण्यासाठी आधी 21 वर्षांचा हो..." कुटुंबियांचं बोलणं अन्...

point

नैराश्यातून 19 वर्षीय तरुणाने संपवलं आयुष्य!

Mumbai Crime: नांदेडमध्ये प्रेमसंबंधातून ऑनर किलिंगची भयानक घटना घडल्यानंतर आता ठाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाण्यातील एका 19 वर्षीय तरुणाने फाशी घेत आत्महत्या केल्याचं वृत्त आहे. पीडित तरुणाला एका मुलीसोबत लग्न करायचं होतं. मात्र, त्याने कुटुंबियांना याबद्दल सांगितल्यानंतर ते तरुणाला म्हणाले की, "आता तू 19 वर्षांचा आहेस, लग्न करण्यासाठी 21 वर्षे पूर्ण होऊदेत." कुटुंबियांच्या या बोलण्याने पीडित तरुणाला अतिशय वाईट वाटलं. याच कारणामुळे नैराश्यात येऊन तरुणाने फाशी घेऊन आत्महत्या केली. 

हे वाचलं का?

प्रेयसीसोबत लग्न करायचं होतं... 

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना 30 नोव्हेंबर 2025 रोजी घडली. तरुणाने घराच्या वरच्या मजल्यावर जाऊन ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला आणि स्वत:चं आयुष्य संपवलं. पीडित तरुण एका मुलीसोबत प्रेमसंबंधात असून त्याला तिच्यासोबत लग्न करायचं होतं, असं प्राथमिक तपासावरून स्पष्ट होत आहे. 

हे ही वाचा: मुंबईत रिक्षा चालकाचा 62 वर्षीय महिलेवर बलात्कार! अखेर, कोर्टाने सुनावली 'ती' शिक्षा अन्...

तरुणाच्या मानसिक स्थितीवर प्रश्नचिन्ह 

पोलिसांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितलं की, मुलगा डोंबिवली शहरात राहत होता आणि त्याचे कुटुंबीय हे मूळचे झारखंड येथील रहिवासी होते. मानपाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी आता या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असल्याची माहिती आहे. पोलिसांनी या घटनेसंदर्भात अपघाती मृत्यू म्हणून प्रकरण दाखल केली असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, नांदेडमधील आंतरजातीय ऑनर किलिंगनंतर उघडकीस आलेल्या या घटनेमुळे प्रेमसंबंध आणि सामाजिक दबावामुळे तरुणाच्या मानसिक स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

हे ही वाचा: अमरावती : सरकारी कर्मचाऱ्याने पत्नीला डोक्यात उखळ घालून संपवलं, दुसऱ्या पतीला ब्लॅकमेल करणे पिंकीच्या अंगलट

आत्महत्येचे विचार आल्यास काय करावं? 

पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे. जर मनात आत्महत्येचे विचार येत असतील तर मानसोपचारतज्ज्ञांशी बोलून समस्येवर उपाय शोधता येऊ शकतात. यासाठी हेल्पलाइन क्रमांक 14416 आहे, जिथे 24X7 संपर्क साधता येऊ शकतो. याशिवाय, इतर अनेक हेल्पलाइन क्रमांक आहेत ज्यावर अशा मानसिक तणावातून उपाय शोधण्यासाठी संपर्क साधता येतात. 

    follow whatsapp