आधीच्या नवऱ्याला भेटायला गेली अन् रागाच्या भरात लिव्ह इन पार्टनरने केलं भयानक कृत्य! मुंबईतील महिलेसोबत काय घडलं?

मुंबईमध्ये एका व्यक्तीने आपल्या लिव्ह-इन-पार्टनरची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची बातमी समोर आली आहे. आपली प्रेयसी तिच्या आधीच्या नवऱ्याला भेटायला गेल्याने आरोपी तरुण त्याच्या लिव्ह इन पार्टनरसोबत नाराज होता.

रागाच्या भरात लिव्ह इन पार्टनरने केलं भयानक कृत्य!

रागाच्या भरात लिव्ह इन पार्टनरने केलं भयानक कृत्य!

मुंबई तक

• 12:12 PM • 26 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

रागाच्या भरात लिव्ह इन पार्टनरने केलं भयानक कृत्य!

point

आधीच्या नवऱ्याला भेटायला गेलेल्या महिलेसोबत काय घडलं?

point

मुंबईत घडली भयानक घटना

Mumbai Crime: मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथील मालवणी परिसरात एका व्यक्तीने आपल्या लिव्ह-इन-पार्टनरची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची बातमी समोर आली आहे. आपली प्रेयसी तिच्या आधीच्या नवऱ्याला भेटायला गेल्याने आरोपी तरुण त्याच्या लिव्ह इन पार्टनरसोबत नाराज होता. यामुळे संतापलेल्या आरोपीने पीडितेला बळजबरीने तापावरील (क्रोसिन) गोळ्या खाण्यासाठी दिल्या आणि तिला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर आरोपीने पीडितेच्या तीन वर्षांच्या मुलाचा वीजेच्या तारेने गळा दाबून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. परंतु, घटनेच्या वेळी पीडित महिला ओरडल्यानंतर तिच्या शेजारील लोक घटनास्थळी गोळा झाले आणि आई-मुलाचा जीव वाचू शकला. पोलिसांनी प्रकरणातील आरोपीला अटक केल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

प्रेयसीला पतीला भेटायला गेल्याचं समजलं...

मालवणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील अपार्टमेंटमध्ये सिद्धार्थ पटेल नावाचा 43 वर्षीय तरुण एस.परब नावाच्या तरुणीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. संबंधित महिलेचं आधीच लग्न झालेलं होतं आणि त्यातून तिला साडे तीन वर्षांचा मुलगा सुद्धा असल्याची माहिती आहे. बुधवारी (24 सप्टेंबर) आपली प्रेयसी तिच्या आधीच्या पतीला भेटायला गेली असल्याचं सिद्धार्थला कळालं. 

हे ही वाचा: मुंबई: "लहानपणापासूनच टॉर्चर..." संतापलेल्या तरुणाने वडील आणि आजोबांसोबत केलं 'ते' कृत्य अन् काकांना सुद्धा...

लिव्ह इन पार्टनर प्रचंड संतापला अन्...

लिव्ह इन पार्टनर तिच्या पतीला भेटायला गेल्याचं कळताच आरोपी तरुण अतिशय संतापला आणि त्याने पीडितेला मारहाण करण्यास सुरूवात केली. पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिने तिच्या लिव्ह इन पार्टनर सिद्धार्थला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, त्याने आपल्या पार्टनरची हत्या करण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे, आरोपी कोणतीच गोष्ट ऐकण्यासाठी तयार नव्हता. 22 सप्टेंबर रोजी मुंबईतील मीरा रोड येथे महिलेची तिच्या पतीसोबत भेट झाली. 

हे ही वाचा: तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार! शाळेत जाताना तिघांनी अडवलं अन् नंतर 'त्या' ठिकाणी नेऊन...

बळजबरीने गोळ्या खायला दिल्या 

वरिष्ठ पोलीस अधिकारी शैलेंद्र नागरकर यांनी प्रकरणासंदर्भात बोलताना सांगितलं की सिद्धार्थने रागाच्या भरात आपल्या लिव्ह इन पार्टनरला बळजबरीने घरात ठेवलेल्या क्रोसिन गोळ्या खाण्यासाठी दिल्या. तसेच, आरोपीने पीडित तरुणाच्या मुलाला देखील मारून टाकण्याचा प्रयत्न केला. त्याने वीजेच्या वायरने साडे तीन वर्षांच्या मुलाचा गळा आवळला. मात्र, घटनेच्या वेळी, पीडितेने जोरजोरात ओरडण्यास सुरूवात केली. त्यावेळी, सगळा गोंधळ ऐकून शेजारील लोक गोळा झाले. या प्रकरणाबाबत पोलीस कंट्रोल रूमला फोन करून माहिती देण्यात आली, त्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली. पोलिसांनी महिला आणि तिच्या मुलाला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केलं असून हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, पीडितेचा जबाब घेतला जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सध्या, पोलीस या घटनेचा तपास करत असल्याची माहिती आहे. 

    follow whatsapp