Mumbai News: लोकल ट्रेनचा प्रवास हा मुंबईकरांसाठी सोयीस्कर ठरतो. अगदी कमी वेळेत हवं ते ठिकाण गाठण्यासाठी ट्रेन सोबत मेट्रो सेवा, मोनो रेल आणि बेस्ट बसची सेवा सुद्धा प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र यामधून प्रवास करण्यासाठी वेगवेगळे तिकीट खरेदी करावे लागते. यात प्रवाशांचा वेळ वाया जातो आणि त्यांना त्रासही होतो. प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी आणि वेगवेगळे तिकीट काढण्यासाठीचा त्रास दूर करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) मध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी 'मुंबई 1 स्मार्ट कार्ड' लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा केली होती.
ADVERTISEMENT
एकाच कार्डद्वारे प्रवास
बेस्ट, रेल्वे, मोनो, मेट्रो आणि एमएमआरमधील स्थानिक वाहतुकीसाठी 'मुंबई 1 स्मार्ट कार्ड' वापरता येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. आता उपनगरीय रेल्वे, बेस्ट, मोनो, मेट्रो आणि एसटीतून एकाच कार्डद्वारे प्रवास करण्याचे मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण होणार असल्याची बातमी समोर आली आहे.
कार्ड आणि अॅपचे काम अंतिम टप्प्यात
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) एकात्मिक तिकीट प्रणालीअंतर्गत 'मुंबई 1 स्मार्ट कार्ड' आणि 'मुंबई 1' ॲप तयार करीत आहे. आता या कार्ड आणि अॅपचे काम अंतिम टप्प्यात आलं असून लवकरच ही सेवा प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे.
हे ही वाचा: मोहम्मद शमीला मोठा धक्का, पत्नीला दर महिन्याला द्यावे लागणार 'एवढे' पैसे, कोर्टाचा निर्णय
या कार्डवरुन सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतुकीचे तिकीट उपलब्ध होणार आहे. तसेच, या कार्डच्या साहाय्याने एमएमआरमधील प्रवासी एसटीतूनही प्रवास करू शकतील. 'मुंबई 1 स्मार्ट कार्ड' सोबत 'मुंबई 1' हे ॲपही उपलब्ध असणार आहे. या अॅपवरून प्रवाशांना तिकीट काढता येणार आहे.
हे ही वाचा: Mumbai: शिक्षिका चटावलेली शरीर संबंधांना, विद्यार्थ्याला घेऊन जायची थेट 5 स्टार हॉटेलच्या रुममध्ये अन्...
'या' प्रवाशांसाठी उपलब्ध
एमएमआरडीएच्या 'दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो 2 अ' आणि 'दहिसर – गुंदवली मेट्रो 7' मार्गिकांसाठी तयार करण्यात आलेल्या 'मुंबई 1 कार्ड'मध्येच बदल करण्यात आले आहेत. 'मेट्रो 2 अ', 'मेट्रो 7', 'घाटकोपर – वर्सोवा मेट्रो 1', 'कुलाबा – वांद्रे – सीप्झ – आरे मेट्रो 3', मोनो रेल, बेस्ट, उपनगरीय रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हे कार्ड चालणार आहे. तसेच येत्या काही दिवसांत या कार्डचे लोकार्पण करण्याचे राज्य सरकार आणि एमएमआरडीएचे नियोजन असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ADVERTISEMENT
