"लवकर कारमध्ये बस..." मेट्रो स्टेशनवर जाणाऱ्या महिलेला बंदूक दाखवून धमकी; नेमकं काय घडलं?

नवी मुंबईमध्ये एका महिलेला बंदूक दाखवून धमकी दिल्याचा आणि तिचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका 40 वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेट्रो स्टेशनवर जाणाऱ्या महिलेला बंदूक दाखवून धमकी

मेट्रो स्टेशनवर जाणाऱ्या महिलेला बंदूक दाखवून धमकी (फोटो सोजन्य: Grok AI)

मुंबई तक

• 01:27 PM • 02 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

नवी मुंबईत महिलेला बंदूक दाखवून धमकी

point

मेट्रो स्टेशनवर जाणाऱ्या महिलेसोबत धक्कादायक प्रकार

point

नेमकी घटना काय?

Mumbai Crime: नवी मुंबईमध्ये एका महिलेला बंदूक दाखवून धमकी दिल्याचा आणि तिचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका 40 वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. महिलेच्या तक्रारीवरून तलोजा पोलिसांनी आरोपी कुंदन नेटकेच्या विरोधात शनिवारी एफआयआर नोंदवल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. 

हे वाचलं का?

नेमकी घटना काय? 

पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 28 जून रोजी दुपारी पीडिता मेट्रो स्टेशनला जात असताना आरोपीने तिला रस्त्यात अडवलं. प्रकरणातील आरोपी पीडितेच्या ओळखीचा असल्याची माहिती समोर आली. तक्रारीनुसार, आरोपीने महिलेला तिच्याशी बोलण्यासाठी कारमध्ये बसण्यास सांगितलं. त्यानंतर आरोपीने महिलेकडून शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची मागणी केली. यावर पीडितेने आरोपीला नकार दिला असता त्याने बंदूक दाखवून महिलेला धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सगळ्या प्रकारानंतर पीडित महिलेला तिथून पळून जाण्यात यश मिळालं आणि ती लगेच पोलिसांकडे पोहोचली. या प्रकरणाचा तपास सुरु असून अद्याप कोणालाच अटक झाली नसल्याची माहिती पोलिसानी दिली. 

हे ही वाचा: विद्यार्थींनीची छेडछाड, पालकांनी शिक्षकाला शाळेच्या मैदानातच चोपलं, मुश्रीफांनी फोन केला आणि म्हणाले...

आरोपीविरोधात तक्रार दाखल

या घटनेतील पीडित महिलेच्या तक्रारीवरून, पोलिसांकडून शनिवारी आरोपी कुंदन नेटके विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलम 75 (लैंगिक छळ) आणि 351(2) (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला.

हे ही वाचा: "मराठीतच बोलावं लागेल" म्हणत हिंदीत दम भरला, मनसैनिकांनी स्टॉल चालकाला केली मारहाण

आणखी एक प्रकरण

नवी मुंबईमध्ये अशीच एक घटना घडल्याची बातमी समोर आली होती. एक महिला रस्त्याने चालत जात असताना एका 30 वर्षीय रिक्षा चालकाने तिला टक्कर मारली. यावरुन महिला आणि रिक्षा चालकाच्या मध्ये वाद झाला असता आरोपीने गाडीतून उतरून पीडितेला जवळ ओढळं आणि तिला चुकीच्या ठिकाणी स्पर्श करुन चाकूने हल्ला करण्याची धमकी दिली. या प्रकरणातील आरोपीचं नाव रोहित गोपाल गाडे असून पोलिसांनी रस्त्याने जाणाऱ्या महिलेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. 


 

    follow whatsapp