Pune News : कृष्णा पांचाळ - पुण्यात मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका सोसायटीच्या बागेत खेळत असताना चार वर्षांची चिमुरडी 15 फूट खोल खड्ड्यात पडल्याचे वृत्त आहे. घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे. चिमुरडीचं नाव श्रीजा अनिल सांगळे (वय 4) असे आहे. या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : जालन्यात विवाहितेचा अमानुष छळ, माहेरहून पैसे आणण्यास टाकला दबाव, पीडितेनं गळफास घेत संपवलं जीवन
चार वर्षांची चिमुरडी 15 फूट खोल खड्ड्यात पडली
श्रीजा ही बागेत खेळताना तिने जवळच्या बसण्याच्या जागेवर उडी मारली, परंतु तिचा तोल गेला आणि ती जवळच्या पार्किंगच्या जागेतील 15 फूट खोल खड्ड्यात पडली. सुदैवाने मुलीला गंभीर दुखापत झाली नाही, तिला ताबडतोब वाचवले आणि उपचारासाठी नेण्यात आले.
वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
संबंधित घटनेनंतर कुटुंबाने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. किंग मल्टीलेव्हल कार पार्किंग सिस्टमचे बिल्डर आणि संचालक जगन्नाथ राऊत यांच्याविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
हे ही वाचा : आधी 'वेलेंटाईन डे' अन् दुसऱ्याच दिवशी प्रेयसीला संपवलं, तरुणाने पोलीस ठाण्यात जाऊन सगळंच सांगितलं
अपघाताचं कारण समोर
दरम्यान, कुटुंबाचा आरोप आहे की, पार्किंग खड्डा उघडा आणि असुरक्षित ठेवल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत आहेत. दरम्यान पुण्यात अशा अनेक घटना घडू लागल्या आहेत. यामुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ADVERTISEMENT











