श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला 7 हजार आंब्यांचा महानैवेद्य, अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून 'आंबा महोत्सव'

Akshayya Tritiya : ''अक्षय तृतियेनिमित्त बाप्पाला 7 हजार आंब्यांचा आरासरुपी दाखवलेला केवळ महानैवेद्य नसून मानवतेचीही पूजा आहे. कारण हे सर्व आंबे शहरातील विविध आश्रमात वाटप करण्यात येणार आहेत. बाप्पाचा भाविक म्हणून आमच्या सर्वांसाठीच हे अत्यंत पवित्र कार्य असून आमच्या हातून ते असंच वाढत जावो, ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना'', अशा भावना उत्सव प्रमुख श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुनीत बालन यांनी व्यक्त केल्या. 

Akshayya Tritiya

Akshayya Tritiya

मुंबई तक

19 Apr 2026 (अपडेटेड: 19 Apr 2026, 07:19 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने पारंपारिक उत्साहात 'आंबा महोत्सव' साजरा

point

7 हजार आंब्यांचा वापर करून आकर्षक सजावट

Akshayya Tritiya :  ''अक्षय तृतियेनिमित्त बाप्पाला 7 हजार आंब्यांचा आरासरुपी दाखवलेला केवळ महानैवेद्य नसून मानवतेचीही पूजा आहे. कारण हे सर्व आंबे शहरातील विविध आश्रमात वाटप करण्यात येणार आहेत. बाप्पाचा भाविक म्हणून आमच्या सर्वांसाठीच हे अत्यंत पवित्र कार्य असून आमच्या हातून ते असंच वाढत जावो, ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना'', अशी भावना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी व्यक्त केली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : हॉटेलच्या खोलीत प्रेयसीचे भयंकर कांड, दारूच्या नशेत तिने प्रियकरासोबत नको तेच केलं... अंगावर काटा आणणारी घटना

भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने पारंपारिक उत्साहात 'आंबा महोत्सव' साजरा

अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर देशातील पहिला सार्वजनिक गणपती भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने पारंपारिक उत्साहात 'आंबा महोत्सव' साजरा करण्यात आला. यादरम्यान, बाप्पााला 7 हजार आंब्यांच्या नैवेद्य दाखवण्यात आला. याच निमित्ताने सजावट देखील करण्यात आली होती, गणरायाच्या भक्तीत भक्त तल्लीन झाले होते. बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती. 

महोत्सवाच्या निमित्ताने सकाळी आरती बी. यू. भंडारी ग्रुपचे चंद्रवर्धन भंडारी व उल्हास घाटगे यांनी आपली पत्नी, तसेच चिवडेवाले रामचंद्र भगवानदास यांच्या हस्ते भक्तिभावाने आरती पार पडली होती. अशावेळी घटनास्थळी भाविकांना आरतीत सहभागी होत मंगलमय वातावरणाचा अनुभव घेतला होता. 

7 हजार आंब्यांचा वापर करून आकर्षक सजावट

आंबा महोत्सवासाठी गणरायची 7 हजार आंब्यांचा वापर करून आकर्षक सजावट करण्यात आली. विविध प्रकारे आंब्यांनी सजवलेले गणरायाचे रुप भाविकांचे विशेष आकर्षण ठरते, दर्शनासाठी दिवसभर भाविकांनी रांग पाहायला मिळते. सजावटीचे आंबे नंतर लहान मुलांच्या अनाथ आश्रमात वाटप केले जातील. 

हे ही वाचा : Astrology : अक्षय्य तृतीयाला 'या' राशीतील लोकांना आर्थिक फायदा होणार, जाणून घ्या धार्मिक यात्रा आणि योग

दरम्यान, ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा महोत्सवर उत्साहात साजरा करण्यात आला. पुणेकरांना या सोहळ्याबाबत मोठी उत्सुकता दिसून आली. अशातच ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.