हॉटेलच्या खोलीत प्रेयसीचे भयंकर कांड, दारूच्या नशेत तिने प्रियकरासोबत नको तेच केलं... अंगावर काटा आणणारी घटना

मुंबई तक

Crime News : हॉटेलच्या ताजपथ रुम क्रमांक 204 मध्ये अचानक भीषण अपघात घडला. एका खोलीतून किंकाळ्या आणि रडण्याचा आवाज ऐकू आला तेव्हा हॉटेलचे कर्मचारी थक्क झाले. तिथे एका तरुणाच्या रक्ताने माखलेला मृतदेह पडलेल्या अवस्थेत आढळून आला होता. अशातच हॉटेलचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. 

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

दोघेही खोली क्र. 2024 मध्ये एकत्र दारू पीत होते

point

बॅगेतून हातोडा काढून प्रियकराच्या डोक्यावर वारंवार हल्ला केला

Crime News : उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एटामध्ये हॉटेलच्या ताजपथ रुम क्रमांक 204 मध्ये अचानक भीषण अपघात घडला. एका खोलीतून किंकाळ्या आणि रडण्याचा आवाज ऐकू आला तेव्हा हॉटेलचे कर्मचारी थक्क झाले. तिथे एका तरुणाच्या रक्ताने माखलेला मृतदेह पडलेल्या अवस्थेत आढळून आला होता. अशातच हॉटेलचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. 

हे ही वाचा : तरुणीसोबत वृद्ध नेत्याचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ, काँग्रेस-भाजपमध्ये चांगलीच जुंपली

दोघेही खोली क्र. 2024 मध्ये एकत्र दारू पीत होते

संबंधित हत्येनंतर ती महिला मृतदेहाशेजारी निर्भयपणे बसून राहिली होती, नंतर ओरडत म्हणू लागली की, 'कोणीतरी त्याची हत्या केली', तिचे हे वागणे बघून अनेकांच्या अंगावर काटा आला. फतेहपूर सिक्रीचा रहिवासी असलेला तो तरुण त्याच्या प्रेयसीसोबत आला होता. प्राथमिक तपासातून उघडकीस आले की, ते खोली क्र. 2024 मध्ये एकत्र दारू पीत होते. 

बॅगेतून हातोडा काढून प्रियकराच्या डोक्यावर वारंवार हल्ला केला

दरम्यान, या वातावरणाचे रक्तरंजित खेळात रूपांतर झाले. आरोपी महिलेचा राग या गोष्टीवरून दिसून येतोय की, तिने आपल्या बॅगेतून हातोडा काढून प्रियकराच्या डोक्यावर वारंवार हल्ला केला. ज्यात तो बेशुद्ध झाला आणि स्वत:ला वाचवू शकला नाही. 

तिचा प्रियकर बेशुद्ध अवस्थेत पडताच, महिलेनं आपल्या पिशवीतून धारदार शस्त्र काढून त्याचा गळा चिरला. हॉटेलच्या खोलीतील ही हत्या एका सुनियोजित कटाचा परिणाम असल्याचे दिसून येते. संबंधित प्रकरणात पोलिसांच्या तपासातून सत्य उघडकीस आले. आरोपी महिला आई असून ती प्रियकराची भाची होती. या नात्यामुळे खूनाचे प्रकरण गुंतागुंतीचे झाले आहे.

हे वाचलं का?