पुणे: वाई (जि. सातारा) येथील सराफ व्यावसायिकाचा 27 वर्षीय मुलगा गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता होता. मात्र, पुण्यातील लॉजमध्ये या बेपत्ता असलेल्या मुलाचा गळफास घेतल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित तरुणाने पुण्यातील कॅम्प परिसरातील मुकेश लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं काल रात्री उघडकीस आलं. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी आर्थिक नुकसानीतून आलेल्या नैराश्यातून पीडित तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या...
पियुष अशोक ओसवाल (रा. कन्याशाळेजवळ, 365 मधली आळी, ता. वाई, जि. सातारा) असं मृत तरुणाची ओळख समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 24 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास कॅम्प परिसरातील मुकेश लॉजमध्ये एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये फोनवरून मिळाली. घटनेची माहिती मिळताच, बंडगार्डन पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यावेळी लॉजमधील रूममध्ये पियुष ओसवालचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.
हे ही वाचा: बार्शी : हॉस्टेलवर राहणारी मुलगी फोन उचलत नसल्याने आई रात्रभर चिंतेत, सकाळी आलेल्या बातमीने हळहळ
आठ दिवसांपासून बेपत्ता
प्रकरणाच्या तपासादरम्यान अधिक चौकशी केली असता, पियुष गेल्या आठ दिवसांपासून घरातून बेपत्ता असल्याचं निष्पन्न झालं. या काळात, तो दिवस पुण्यातील एका मित्राकडे थांबला असल्याची देखील माहिती मिळाली आणि त्यानंतर त्याने कॅम्प परिसरातील मुकेश लॉजमध्ये खोली भाड्याने घेऊन तिथे आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा: छत्रपती संभाजीनगर : वसतीगृहात राहणाऱ्या मैत्रिणीचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ गुपचूप शूट केले, अन् बॉयफ्रेंडला पाठवले
वृत्तानुसार, पियुष ओसवाल हा एका सराफ व्यावसायिकाचा मुलगा असून सट्टा व्यवहारात मोठी रक्कम गमावल्यामुळे तो आर्थिक अडचणीत सापडला होता. याच आर्थिक नुकसानीतून आलेल्या नैराश्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज तपास अधिकारी PSI गणेश चव्हाण यांनी व्यक्त केला. सध्या, बंडगार्डन पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT











